TRENDING:

T20 World Cup : फायनलमध्ये टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' फेल ठरणार?, सूर्या-गंभीरची धाकधूक वाढली,नेमकं काय घडलं?

Last Updated:
दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच 'ब्रम्हास्त्र' खूप चाललं आहे. या'ब्रम्हास्त्र'मुळेच टीम इंडियाला इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचलो होतो.
advertisement
1/10
फायनलमध्ये टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' फेल ठरणार?, सूर्या-गंभीरची धाकधूक वाढली,न
टी20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाणार आहेत. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.
advertisement
2/10
या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे
advertisement
3/10
फायनल सामन्याआधी दोन्ही संघांनी आज मैदानात कसून प्रॅक्टीस केली आहे. आता उद्या या सर्व खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे.
advertisement
4/10
दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच 'ब्रम्हास्त्र' खूप चाललं आहे. या'ब्रम्हास्त्र'मुळेच टीम इंडियाला इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचलो होतो.
advertisement
5/10
तुम्हाला प्रश्न पडला असेल हे 'ब्रम्हास्त्र' काय आहे,तर हे 'ब्रम्हास्त्र'दुसरं तिसरं कुणी नसून टीम इंडियाच्या गोलंदाजीची ताकद जसप्रीत बुमराह आहे.
advertisement
6/10
जसप्रीत बुमराहने सेमी फायनल सामन्यात इंग्लंड विरूद्ध 254 धावांचा बचाव 4 जादूई ओव्हर टाकल्या होत्या. या त्याच्या 4 ओव्हरमध्ये त्याने 33 धावा देऊन टीम इंडियाला फायनलला पोहोचले होते.
advertisement
7/10
पण फायनलला पोहोचवून बुमराहच काम संपलं नाही आहे.त्याला आता भारताला फायनल जिंकवायच आहे. पण हे तितकसं सोप्प नाही आहे. कारण बुमराहचे आकडे न्यूझीलंड विरूद्ध खूपच खराब आहेत.
advertisement
8/10
न्यूझीलंड हा एकमेव संघ आहे ज्याविरुद्ध जसप्रीत बुमराहची सर्व फॉरमॅटमधील आकडेवारी त्याच्या एकूण कारकिर्दीतील आकडेवारीपेक्षा वाईट आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहची कारकिर्दीची सरासरी 18.57 आहे, परंतु न्यूझीलंडविरुद्ध ती 23.37 पर्यंत वाढते
advertisement
9/10
बुमराहचा कारकिर्दीचा स्ट्राइक रेट 17.O आहे, परंतु किवींविरुद्ध तो 19.8 पर्यंत वाढतो. इकॉनॉमी रेटच्या बाबतीत, बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध 7.05 च्या सरासरीने धावा दिल्या, तर त्याचा करिअरचा इकॉनॉमी रेट 6.55 आहे. ही फक्त टी20 ची आकडेवारी दाखवत आहोत, परंतु बुमराहचा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये रेकॉर्ड देखील खराब राहिला आहे.
advertisement
10/10
आता जर भारत तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकू इच्छित असेल, तर बुमराहला अंतिम फेरीत त्याची जादू दाखवावी लागेल.जर तसे नाही झाले तर टीम इंडियाच 'ब्रम्हास्त्र'फेल ठरले आणि भारत हातचा सामना गमवावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फायनलमध्ये टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' फेल ठरणार?, सूर्या-गंभीरची धाकधूक वाढली,नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल