Weather Alert : महाराष्ट्रात आता मार्चमध्येच मे सारखा उन्हाळा, हवामान विभागाचा इशारा, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
विदर्भातील अमरावतीमध्ये 40 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले असून येणाऱ्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
1/7

महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला दिसत आहे. 8 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावतीमध्ये 40 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले असून येणाऱ्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान 23-26 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश, किमान 18-21 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्येही तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश, रात्री 19-22 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-38 अंशांपर्यंत राहील, तर किमान 20-23 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-41 अंश तर किमान 21-24 अंश राहील. अमरावती, अकोला आणि वर्ध्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, ८ मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तीव्र चटका जाणवत आहे. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता मार्चमध्येच मे सारखा उन्हाळा, हवामान विभागाचा इशारा, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट