TRENDING:

Chhatrapati Sambhajinagar: वेगाची नशा...! भरधाव कारने रिक्षा अन् दुचाकीला उडवलं, छ. संभाजीनगरात भयंकर घडलं

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: जळगाव रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक एकाच बाजूने सुरू होती. याच ठिकाणी हा अपघात घडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: शहर आणि परिसरात सुसाट वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतीच समृद्धी महामार्गावर चौघांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच, शहरातील जळगाव रोडवर पुन्हा एक भीषण अपघात घडला. अवघ्या 19 वर्षीय भरधाव कारचालकाने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर शहरात घडली.
वेगाची नशा...! भरधाव कारने रिक्षा अन् दुचाकीला उडवलं, छ. संभाजीनगरात भयंकर घडलं
वेगाची नशा...! भरधाव कारने रिक्षा अन् दुचाकीला उडवलं, छ. संभाजीनगरात भयंकर घडलं
advertisement

या अपघातात दुचाकीस्वार बुधाराम डंगुराम बिष्णोई (वय 33, मूळ रा. बालोतरा, राजस्थान) यांचा जागीच मृत्यू झाला. बुधाराम हे आपल्या भाऊ रमेश आणि इतर नातेवाइकांसह शहरात मिठाई व केटरिंगचा व्यवसाय करत होते. रविवारी दुपारी सुमारे 12 वाजता ते दुचाकीवरून हर्सूल परिसराकडे निघाले होते. दरम्यान, जळगाव रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक एकाच बाजूने सुरू होती. याच ठिकाणी हा अपघात घडला.

advertisement

जिथं मनाई होती, तिथंच पोहोचल्या महिला, 700 वर्षांत हे पहिल्यांदाच झालं, छ. संभाजीनगरात काय घडलं?

सिडको बसस्थानकाच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालक साहिल कैलास राऊत (वय 19, रा. बुलढाणा) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार थेट दुभाजकावर चढली आणि पुढे बुधाराम यांच्या दुचाकीला जबर धडक देत रिक्षाचालक जावेद शेख यांच्या रिक्षावर आदळली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच बुधाराम यांचा मृत्यू झाला. जावेद शेख यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

advertisement

अपघातानंतरही साहिल राऊत याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याची सोमवारी हर्सूल कारागृहात रवानगी केली. प्राथमिक चौकशीत साहिल हा आई-वडिलांसह शहरात लग्न समारंभासाठी आला होता. आई-वडिलांना कार्यक्रमस्थळी सोडून तो मित्राला भेटण्यासाठी निघाला असताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

advertisement

पुणे रोडवर भरधाव कारची धडक, तरुणाचा मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

दरम्यान, अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत पुणे रोडवर 6 मार्च रोजी झालेल्या अपघातात प्रशांत गणेश गलबे (रा. पाथरी, जि. परभणी) या तरुणाचा मृत्यू झाला होता. गोलवाडी फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने ते डोक्यावर आदळले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच प्रशांत यांच्या आईचे निधन झाले होते. या सलग घटनांमुळे शहरात सुसाट वाहनचालकांविरोधात कडक कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: वेगाची नशा...! भरधाव कारने रिक्षा अन् दुचाकीला उडवलं, छ. संभाजीनगरात भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल