advertisement

जिथं मनाई होती, तिथंच पोहोचल्या महिला, 700 वर्षांत हे पहिल्यांदाच झालं, छ. संभाजीनगरात काय घडलं?

Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: ‎‎सामाजिक ऐक्य, स्त्रीशक्ती आणि धर्मांमधील सलोखा यांचे दर्शन घडवणारी ही घटना कन्नड शहरासाठी अभिमानाची ठरली आहे.
1/5
‎‎छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सिद्दीक शहा बाबा यांच्या उरुसाला यंदा विशेष आणि ऐतिहासिक सुरुवात झाली. सुमारे 700 वर्षांची परंपरा असलेल्या या उरुसात प्रथमच तीन महिला उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दर्ग्यावर चादर चढवून स्त्री-पुरुष समानतेचा आणि सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला.

2/5
‎‎रविवारी (दि. 9) सुरू झालेल्या उरुसाच्या प्रारंभी उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, तहसीलदार सारिका भगत आणि कन्नड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शेख फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी एकत्रितपणे दर्ग्यावर चादर अर्पण केली. या तिन्ही पदांवर कार्यरत महिला प्रतिनिधींनी एकत्र येऊन परंपरेत सकारात्मक बदल घडवत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.‎‎

3/5
या प्रसंगी तहसीलदार सारिका भगत यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचा उपयोग करून महिलांनी समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे, हा या कृतीमागचा संदेश आहे. उरुसाच्या इतिहासात प्रथमच महिलांनी असा मान मिळवणे ही केवळ परंपरेतील घटना नसून स्त्रीशक्तीच्या सन्मानाचे प्रतीक आहे.‎‎

4/5
ज्या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेशाची मर्यादा होती, त्या ठिकाणी या महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चादर चढवली. त्यामुळे समाजात सकारात्मक विचारांना चालना मिळेल आणि महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. ‎‎यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल जावेद शेठ, दर्ग्याचे मुतवल्ली इम्रान शहा, चांद शहा, आहले सुन्नतवल जमातचे अध्यक्ष गणी मिस्त्री, मुसा मिस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

5/5
‎‎सामाजिक ऐक्य, स्त्रीशक्ती आणि धर्मांमधील सलोखा यांचे दर्शन घडवणारी ही घटना कन्नड शहरासाठी अभिमानाची ठरली आहे. परंपरा जपत समाजाला नवी दिशा देण्याचा संदेश देणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.‎‎‎

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement