इतक्या वर्षांच्या मेहनतीवर एका दिवसात पाणी फेरलं! 2 महिन्यांपासून करतोय प्रयत्न, अभिनेता विवेक सांगळेसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लग्नानंतर होईलच प्रेम फेम प्रसिद्ध अभिनेता विवेक सांगळे गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. त्याने अखेर व्हिडीओ शेअर करत सगळं सांगितलं.
काही दिवसांआधी प्रसिद्ध सोशल मीडिया क्रिएटर प्रसिकाचं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. खूप मेहनतीने त्यांनी ते परत मिळवलं. त्यानंतर आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळेसोबतही असाच प्रकार घडला आहे. त्यांचे व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद झालं. त्याने प्लॅटफॉर्मने सांगितलेली नियमित अपील प्रक्रिया पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. इंस्टाग्राम अकाउंट बंद होऊन तब्बल 65 दिवस उलटले, तरीही अपीलवर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान तब्बल 65 दिवसांनी विवेक सांगळेनं मोठा निर्णय घेतला.
स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे विवेक यांना यापूर्वी ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेमुळे मोठी ओळख मिळाली होती. अकाउंट बंद होण्यापूर्वी विवेक यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या अनेक रील्सना लाखो आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते. त्यापैकी एका व्हिडिओला 32 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
advertisement
आजच्या काळात कलाकारांसाठी इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवादाचे माध्यम नसून प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसेच व्यावसायिक संधींवरही परिणाम होऊ शकतो, असे इंडस्ट्रीतील काही निरीक्षकांचे मत आहे..
advertisement
दरम्यान, चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी विवेक यांनी नवे इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले असून चाहत्यांना ते फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. विवेकनं व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, "गेली दोन महिने झाले माझ्या खूप मित्रांचे मेसेज येतायत फोन येत आहेत तू कुठे आहेस, काय झालंय, तुझं इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत नाहीये. तू गायब झालास इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलिट वगैरे केलंस का, सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलास का?"
advertisement
advertisement
"सगळ्यांना मला सांगायचं आहे की, 3 जानेवारीला इन्स्टाग्रामने मला कोणतीही पूर्वकल्पना न देता माझं अकाऊंट डिलिट केलं. ते अकाऊंट परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मेटाच्या बीकेसी ऑफिसला फोन केला. मेटाच्या युएस टीमशी बोललो. पण त्यांनी माझ्या एकाही फोनला रिप्लाय दिला नाही. जे अकाऊंट तुम्ही स्वत: व्हेरिफाइड करता त्या व्यक्तीला कोणतीही पूर्वकल्पना न देता तुम्ही त्याचं अकाऊंट सस्पेंड करताय."
advertisement
विवेक पुढे म्हणाला, "इतक्या वर्षांची मेहनत असते त्यावर एका दिवसांत पाणी फेरलं. खूप वाईट वाटलं मला. अकाऊंट परत मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यात मी सगळ्या बाजूंनी प्रयत्न केले. पण काहीच घडत नाहीये. लाईफ तुम्हाला एक संधी देत असतं, ती संधी मिळवण्याचं मी ठरवलं आहे. मी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर सुरूवात करतोय. मला खात्री आहे यावेळीसुद्ध तुम्ही मला भक्कम पाठिंबा द्या."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 11:49 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
इतक्या वर्षांच्या मेहनतीवर एका दिवसात पाणी फेरलं! 2 महिन्यांपासून करतोय प्रयत्न, अभिनेता विवेक सांगळेसोबत नेमकं काय घडलं?









