रामललाच्या तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तीन शिल्पकारांपैकी कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या मूर्तीला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर लिहिले की, जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.