मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण होणार असून त्यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी राज्यभरातील मराठा आंदोलकांची एक बैठक घेतली. या बैठकीत आझाद मैदानावरील आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं. उपोषणात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय.