पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी पाहायला मिळाली. ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमादरम्यान कांबळेंनी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली. पण हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचं लक्षात येताचं या आमदार महाशयांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावले. पण त्यांचा तो कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला होता.