राममंदिर आंदोलनात सुरुवातीपासून अग्रभागी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे याआधी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे या कार्यक्रमाला येणार नव्हते. पण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अडवाणींचं राममंदिर लढ्यातलं योगदान पाहता त्यांना या सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती केली आहे.