राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलं आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीन बहिष्कार टाकला आहे. राज्यात शेतकऱ्यांपासून बेरोजगारीपर्यंत अनेक प्रश्न जनतेसमोर असताना या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.