अयोध्येतील राम मंदिरावरून सुरु झालेलं राजकीय वादाचं पुराण काही संपायचं नाव घेत नाही. एकीकडं भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना रंगला असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आता वादाची ठिणगी पडलीय.राम मदिर उद्घाटनावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.