
अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहतंय. पण त्यामागचा कारसेवकांचा संघर्ष खूप मोठा आहे. त्या संघर्षादरम्यान दोन कारसेवा करण्याची संधी मिळालेले, बाबरी पाडताना तिथे उपस्थित असणारे आणि बाबरीचा ढाचा पडल्यावर त्याची वीट घरी आणलेले तीन कारसेवक यांच्याशी न्यूज18 लोकमतचे मिलिंद भागवत यांनी साधलेला हा खास संवाद...
Last Updated: Jan 20, 2024, 20:42 ISTमुंबई: नवीन वर्ष सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असणार, कोणत्या राशीसाठी अनुकूल तर कोणत्या राशीसाठी थोडं आव्हानात्मक असणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीवरून वर्षाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार योग्य तयारी करता येते. येणाऱ्या 2026 या वर्षात तीन राशींना गुरुपीडेला सामोरे जावे लागणार आहे. ही माहिती दाते पंचांगानुसार देण्यात आली असून याबाबत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.
Last Updated: Dec 24, 2025, 18:34 ISTपुणे: विविध उद्योगांना एका ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भीमथडी जत्रा सध्या पुण्यात सुरू आहे. पुण्यातील या जत्रेमुळे केवळ खाद्य आणि वस्त्र उद्योगालाच नव्हे तर ग्रामीण संस्कृती, लोककला आणि महिला उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. या जत्रेमध्ये राज्यभरातील अनेक महिला बचत गट सहभागी झाले असून, त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. याच भीमथडी जत्रेमध्ये पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील दुर्गामाता महिला बचत गटाने सादर केलेल्या हँडमेड गोधड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
Last Updated: Dec 24, 2025, 18:01 ISTसावधान! थंडी तुमच्या हृदयासाठी ठरू शकते घातक; उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी \'या\' चुका टाळाच!\r\n\r\nछत्रपती संभाजीनगर: शहरातील तापमानात सतत चढ-उतार होत असताना गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. शहरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. थंडीच्या दिवसांत रक्तदाब वाढू शकतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहाला अधिक दाब लागतो. आधीच उच्च रक्तदाबाचा आजार आहे, त्यांच्यासाठी ही समस्या गंभीर ठरू शकते.\r\n
Last Updated: Dec 24, 2025, 17:39 ISTपुणे: सध्या सगळीकडे ख्रिसमस सणाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठामध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांसाठी हा महत्त्वाचा सण मानला जातो.
Last Updated: Dec 24, 2025, 16:45 ISTनवी मुंबई: मेघा नाईक यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा साड्यांचा व्यवसाय उभारला आहे. बारावी (कॉमर्स) पर्यंत शिक्षण झालेल्या मेघा नाईक यांचे लग्न कमी वयात झालं. त्यानंतर संसाराची जबाबदारी आणि मातृत्वाची नवी भूमिका स्वीकारत असतानाच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2017 साली, अवघ्या सहा महिन्यांच्या लहान मुलाची आई असताना, मेघा नाईक यांनी साड्यांच्या व्यवसायात पाऊल ठेवले. या निर्णयामागे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द होती. या प्रवासात त्यांना कुटुंबाचा आणि विशेषतः पतीचा मोलाचा पाठिंबा लाभला.
Last Updated: Dec 24, 2025, 16:22 IST