मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. घटक पक्षाचा कामापुरता मामा होऊ नये, अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केलीय. तर महायुतीतील पक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केल्यानं पुन्हा राजकीय लढाई सुरू झालीय. पाहूयात राजकीय लढाईचा हा रिपोर्ट...