गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सिंहासन सिनेमाची चांगलीचं चर्चा रंगलीय. पिंपरी चिंचवडच्या नाट्य संम्मेलनात अभिनेते प्रशांत दामलेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राजकीय नेते 365 दिवस आणि 24 तास नाटकं करतात अशी कोटी केली होती. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही टीका केली होती.