
सरकारने हैद्राबाद गॅझेटीयरच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी देण्याचं आश्वासन दिले होतं. त्यावेळी ही प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्यात आली होती, असं सांगितलं गेलं होतं.पण हे आश्वासन सरकारने सहा महिने झाले तरी पुर्ण केले नाही. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.