
Ashok Kharat News | भोंदूगिरी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अटक असलेल्या अशोक खरात प्रकरणात कोर्टात धक्कादायक दावे करण्यात आले. सरकारी वकिलांनी खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात जोरदार युक्तिवादानंतर कोर्टाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ करत त्याला 29 मार्चपर्यंत कोठडी सुनावली.