
आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे.प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे समर्थक सयाजी शिंदे यांनी आज सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे कमालीचे भावूक झाले होते.ते म्हणाले, "अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालाय. नेमकं काय बोलावं, हेच सुचत नाहीये.त्यातच आमदार रोहित पवार यांनी येत्या १२ तारखेला एका पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केल्याने सस्पेन्स वाढला आहे.