
मुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.
Last Updated: Nov 08, 2025, 16:32 ISTसांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथे एका शेतकऱ्याने बिबट्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून एक गावठी जुगाड केला आहे. या जुगाडाची चर्चा महाराष्ट्रभर आहे. त्याने एक ध्वनी यंत्र तयार केले आहे. त्यात त्याने बॉटल,नटबोल्टचा वापर केला आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 18:31 ISTबदलापुरात वामन म्हात्रे फाऊंडेशन मार्फत आग्री महोत्सवात गौतमी पाटीलचा डान्स बदलापूरकरांना पाहायला मिळाला. तेव्हा तिला पालिका निवडणुकीबद्दल विचारले गेले. तेव्हा ती निवडणुकीवर प्रतिक्रिया देत म्हणाली," मी फक्त डान्स करणार, अॅक्टींग करणार.राजकारणात मला काहीही इंट्रेस्ट नाही."
Last Updated: Dec 28, 2025, 18:04 ISTअहिल्यानगरमध्ये शिर्डी साईमंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. नवे वर्ष सुरु होणार आहे. तसेच पर्यटन सुरु झाले आहे. त्यामुळे या मंदिरात खूपच भक्तांची गर्दी झाली.चक्क देशविदेशातून भक्त साईचरणी लीन झाले आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरला साईमंदिर रात्रभर खुलं राहणार आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 17:45 ISTचंद्रपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रपूरमध्ये सध्या बांबू कापायचे काम सुरु आहे. त्यासाठी तेथे बालाघाटातून मजूर आले आहेत. त्यातील काही मजूर ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील महादवाडीच्या जंगलात काम करत होते. तेव्हा वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन मजूरांचा मृत्यु झाला आहे. प्रेम सिंग हुदे आणि बुधासिंग मढावी अशा मृत व्यक्तींची नावे आहेत.
Last Updated: Dec 28, 2025, 17:32 ISTबिबट्याची दहशत राज्यभर सुरु आहे. त्यातच आता सांगली, येडे निपाणी तालुक्यात वाळवा येथे नारळाच्या झाडावर बिबट्या चढलेला दिसून आला. उत्तम पाटील यांच्या शेतात बिबट्या नारळाच्या झाडावरुन खाली उतरताना काही नागरिकांना दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.गेल्या महिन्याभरात अनेकवेळा बिबट्याचा परिसरात वावर दिसून आला आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 17:17 IST