टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी एका भव्य टूर्नामेंटचं येत्या मार्चमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ISPL अर्थात इंडियन स्ट्रीट प्रिमीयर लीग या स्पर्धेची टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि एमसीए अध्यक्ष अमोल काळेंच्या उपस्थितीत नुकतीच घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा आणि खेळाडूंना या स्पर्धेचा किती फायदा होईल हे सांगतोय टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अशी ओळख असलेला स्टार खेळाडू सुमित ढेकळे....