TRENDING:

महिन्याला 1.3 कोटी रुपये पगाराची ऑफर, सहा महिने कोणाला भेटता येणार नाही; तरुण म्हणाला- गर्लफ्रेंड मला...

Last Updated:

Job Offer: अंटार्क्टिकामध्ये सहा महिन्यांसाठी संशोधनाची संधी आणि त्याबदल्यात कोट्यवधींचा पगार मिळत असल्याने एका तरुण संशोधक गोंधळात पडला आहे. करिअर आणि आर्थिक भविष्य उजळवणारी ही ऑफर स्वीकारावी की नातेसंबंध जपावेत, यावर त्याने इंटरनेटवर सल्ला विचारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: इंटरनेटवर सध्या एका तरुण संशोधकाची कथा चांगलीच चर्चेत आहे. पर्यावरण संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाला अंटार्क्टिकामध्ये सहा महिन्यांच्या करारावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अंटार्क्टिकातील मॅकमर्डो स्टेशनवर संशोधनासाठी जाण्याची ही ऑफर आर्थिकदृष्ट्या अत्यंत आकर्षक असली, तरी वैयक्तिक आयुष्य आणि तीन वर्षांच्या नात्यावर होणाऱ्या परिणामामुळे तो संभ्रमात आहे. आणि निर्णय काय घ्यावा, यासाठी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

advertisement

रेडिटवर स्टोरी पोस्ट करताना तो म्हणतो की, मी पर्यावरण संशोधनात काम करतो आणि माझ्या कंपनीने मला अंटार्क्टिकामध्ये सहा महिन्यांसाठी संशोधनासाठी जायची ऑफर दिली आहे. मॅकमर्डो स्टेशनवर काम करायचं आहे. तिथल्या ठिकाणामुळे पगार अक्षरशः जबरदस्त आहे. सहा महिन्यांसाठी सुमारे 1.3 कोटी रुपये (1.45 लाख डॉलर्स). याशिवाय राहणं, जेवण, प्रवास, कपडे, सगळी साधनसामग्री सगळं कंपनीकडूनच दिलं जाणार आहे.

advertisement

तो पुढे सांगतो की अंटार्क्टिकामध्ये राहिल्यामुळे त्याचा एकही रुपया खर्च होणार नाही. मात्र सहा महिने इतक्या लांब आणि एकाकी ठिकाणी जाण्याबाबत त्याची प्रेयसी फारशी आनंदी नाही. माझी गर्लफ्रेंड मला सपोर्ट करते, पण सहा महिने मी दूर असणार यामुळे ती स्वाभाविकपणे फार खुश नाही. आमचं नातं तीन वर्षांचं आहे. ती परिस्थिती समजून घेते, पण हे सगळं सोपं नाही, असं तो म्हणतो.

advertisement

या संशोधकाने हेही सांगितलं की सध्या त्याची एकूण आर्थिक संपत्ती 1.62 कोटी रुपये (1.8 लाख डॉलर्स) आहे. सहा महिन्यांच्या या करारातून मिळणारा पगार त्याला Financial Independence आणि Retire Early च्या जवळ नेऊ शकतो. माझ्या घरभाड्याचे आणि इतर खर्चाचे पैसे आधीच बाजूला आहेत. त्यामुळे या सहा महिन्यांत मिळणारा पूर्ण पगार मी थेट वाचवू शकतो. पण सहा महिने इतक्या वेगळ्या आणि एकाकी ठिकाणी राहणं मानसिकदृष्ट्या कठीण असू शकतं, जरी करिअरसाठी ही संधी जबरदस्त असली तरी, असं तो लिहितो.

advertisement

तो सतत द्विधा मनःस्थितीत असल्याचंही सांगतो. “दर काही तासांनी माझं मत बदलतं. एकीकडे वाटतं की ही संधी माझा FIRE टाइमलाईन प्रचंड वेगाने पुढे नेऊ शकते. पण दुसरीकडे प्रश्न पडतो. केवळ पैशांसाठी माझं नातं ताणात आणणं योग्य आहे का? किंवा सहा महिने ‘नॉर्मलआयुष्यापासून दूर राहणं खरंच worth आहे का?”

या पोस्टला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेवटच्या अपडेटपर्यंत या पोस्टला 7,000 हून अधिक अपव्होट्स आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. बहुतांश लोकांनी त्याला ही संधी स्वीकारण्याचा सल्ला दिला, तर काहींनी अंटार्क्टिकामधील वास्तव आणि मानसिक आव्हानांकडे लक्ष वेधलं.

Posts from the fire

community on Reddit

एका युजरने लिहिलं, “मी असतो तर नक्की गेलो असतो. फक्त सहा महिन्यांत तुमची नेटवर्थ दुप्पट होणार आहे, ही संधी सोडणं वेडपणाच ठरेल. हे तुम्ही दोघांच्या भविष्यासाठी करत आहात.” दुसऱ्याने अनुभव सांगताना म्हटलं, “मी मॅकमर्डो स्टेशनवर राहिलो आहे. काही काळानंतर ते कंटाळवाणं होतं, पण जर तुम्हाला फील्डमध्ये बाहेर जाण्याची संधी मिळाली तर तो अनुभव आयुष्यातील सर्वोत्तम असतो. मात्र हो, नात्यावर ताण येऊ शकतो.”

तिसऱ्या युजरने लिहिलं, नक्की जा. ही अक्षरशः आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे आणि आर्थिक फायदा प्रचंड आहे. तुझी गर्लफ्रेंड आधीच सपोर्टिव्ह असेल तर ती समजून घेईल. सहा महिने आयुष्याच्या मोठ्या पटावर फारसे जास्त नाहीत. लोक यापेक्षा जास्त काळ लाँग डिस्टन्स नात्यात राहतात आणि त्यांना असा फायदा मिळतही नाही.

चौथ्या प्रतिक्रियेत सल्ला देण्यात आला, तिथलं आयुष्य कसं असतं याचा अभ्यास करून जा, म्हणजे अपेक्षा स्पष्ट राहतील. मॅकमर्डो हे मोठं स्टेशन आहे आणि तिथे तुलनेने जास्त लोक असतात. त्यामुळे तुला फारशी एकाकीपणाची भावना येणार नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पशुवैद्यकीय डॉक्टर झाला पशुपालक, 65 पाळल्या गायी, महिन्याला 3 लाख कमाई
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
महिन्याला 1.3 कोटी रुपये पगाराची ऑफर, सहा महिने कोणाला भेटता येणार नाही; तरुण म्हणाला- गर्लफ्रेंड मला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल