शाळेत आणि आजूबाजूला भीतीचं वातावरण पसरलं आहे. विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक मुलं आणि नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना तातडीनं उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती पोलिसांना आणि आपत्कालीन विभागाला कळवण्यात आली असून शाळेतील मुलांचं बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बांग्लादेशचं AF ट्रेनिंग करणारं विमान शाळेवर कोसळून मोठी दुर्घटना घडली. ढाकामध्ये कॉलेज परिसरात फायटर विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
advertisement
या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे विमान चायना मॉडेल असल्याची माहिती देखील मिळाली आहे. दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी ही भीषण दुर्घटना घडली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 2:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पुन्हा तसंच घडलं! अहमदाबाद विमान दुर्घटनेची पुनरावृत्ती, शाळेवर कोसळलं विमान, पाहा LIVE VIDEO
