हा घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी ही धक्कादायक घटना यूटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. चार्ली किर्क एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. चार्ली किर्क यांची हत्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे, कारण ते ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. याशिवाय ट्रम्प यांचे समर्थक होते. मागच्या निवडणुकीत युवा मतदारांना आकर्षित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
advertisement
चार्ली किर्क हे उजव्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते होते, ज्यांनी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अजेंड्याला पुढे नेण्यात मोठी मदत केली. मूळचे इलिनॉइसचे असलेले किर्क यांनी वयाच्या 18 व्या वर्षी टर्निंग पॉइंट यूएसए या विद्यार्थी गटाची स्थापना केली. ट्रम्प यांच्या कार्यकाळात ते रिपब्लिकन पक्षात एक उगवते नेतृत्व म्हणून पुढे आले. परदेशात भाषण देऊन बुधवारीच अमेरिकेला परतल्यानंतर काही तासांतच त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
भर कार्यक्रमात ते भाषण करत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या मागनेला गोळ्या लागल्या आणि खाली कोसळले, या घटनेमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा हल्ला भरसभेत झाला. किर्क यांना तातडीने एका खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशिरा झाला.
एफबीआय (FBI) संचालक काश पटेल यांच्या माहितीनुसार, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोर अद्याप फरार आहे. किर्क यांचे विचार नेहमीच वादग्रस्त राहिले असल्यामुळे या हत्येमागे राजकीय वैमनस्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हत्येमुळे अमेरिकेतील ‘गन कल्चर’ आणि राजकीय हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चार्ली किर्क यांच्या हत्येबद्दल ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला.