रशिया आणि चीनप्रमाणेच पाकिस्तानही अणुबॉम्बची चाचणी करत असल्याचे त्यांनी खुलासा केला. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत हे दावा केला. उत्तर कोरियाही सातत्याने अणुचाचण्या करत असल्याचा दावा केला. इतर देश चाचण्या करत असल्याने, आता अमेरिकाही पुन्हा न्युक्लिअर टेस्ट करणार असल्याचं स्पष्ट केलं. जगातील अनेक देश गुप्तरित्या न्युक्लिअर टेस्ट चाचणी करत आहेत, पण ते याबद्दल बोलत नाहीत असं ट्रम्प यांनी 'सीबीएस न्यूज'च्या मुलाखतीदरम्यान दावा केला.
advertisement
ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार, रशिया आणि चीन चाचण्या करत आहेत, पण ते याबद्दल बोलत नाहीत. ते हे गुप्त ठेवतात. आम्हाला याबाबत चर्चा करणं भाग आहे. अन्यथा तुम्ही पत्रकार लगेच याची बातमी कराल. त्यांच्याकडे असे पत्रकार नाहीत जे याबद्दल लिहिण्याचे धाडस करतील."
भारत-पाक सीमेवर वाढणार तणाव?
या गुप्त चाचण्यांवर जोर देत ट्रम्प यांनी थेट पाकिस्तान आणि उत्तर कोरियाचे नाव घेतले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या न्युक्लिअर टेस्टवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विशेषतः भारतासाठी ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सतत भारतावर कुरघोडी सुरू आहेत. त्यात जर न्युक्लिअर टेस्ट यशस्वीरित्या पार पडली तर भारताचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनेही ३३ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे देश जमिनीखाली चाचण्या करतात, जिथे लोकांना नेमके काय घडत आहे हे कळत नाही, फक्त किंचित भूकंप झाल्यासारखं जाणवतं, त्यामुळे याबाबत कोणतेही देश स्पष्टपणे उघडपणे बोलत नाहीत. रशिया आणि अमेरिका यांच्यात आधीपासूनच प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. आता न्युक्लिअर टेस्टवरुन पुन्हा संघर्ष होणार का ते पाहावं लागणार आहे.
