बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांंनी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. लष्करप्रमुख म्हणाले की, प्रत्येक खून आणि इतर प्रकरणांचा विचार केला जाईल. बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते पोहोचले होते आणि उत्तम गोष्ट घडली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच ते अंतरिम सरकार स्थापन करणार आहेत. यासंदर्भात आम्ही आम्ही अध्यक्षांशी बोलू.
देशातील जनतेला लष्कराने सहकार्य करण्याचे आवाहन केलंय. देशवासियांनी हिंसाचार आणि निषेधाचा वापर करणार नाहीत अशी अपेक्षा लष्कर प्रमुखांनी व्यक्त केलीय. देशातील अराजकतेच्या स्थितीनंतर बोलावण्यात आलेल्या बैठकीला आवाम लीगचे कुणीही उपस्थित नव्हते असंही लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केलं. आता बांग्लादेशमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
देशवासियांसाठी भाषण रेकॉर्ड करणं राहिलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राजधानी ढाका सोडून गेल्या आहेत. ढाका इथं हिंसाचाराच्या घटना घडत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे. शेख हसीना यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, शेख हसीना या त्यांच्या बहिणीसोबत गणभवन सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. देशवासियांसाठी त्यांना एक भाषण रेकॉर्ड करायचं होतं पण त्यांना संधी मिळाली नाही.