लॅबमधून कोरोना पसरल्याच्या घटनेनंतरही चीन सुधारण्याचं नाव घेत नाही. जगभरात हाहाकार माजलेल्या कोरोनानंतर आता धोकादायक बुरशीमधून पुन्हा एकदा नवा व्हायरस पसरवण्याचा काम चीनकडून केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत दोन तरुणांना जीवघेण्या बुरशीसकट पकडण्यात आलं आहे. ही बुरशी इतकी भयंकर आहे की त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. सुरुवातीला ती शेती, फळबागांना नुकसान पोहोचवू शकते त्यापाठोपाठ माणसाच्या शरीरावरही गंभीर परिणाम करू शकते असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
advertisement
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या रिपोर्टनुसार, जियान युनकिंग आणि लियू जुनयोंग यांना बुरशीजन्स पदार्थासकट अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. चीन आता शेती आणि त्यातून शेतकऱ्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. या बुरशीचं नाव फ्यूजेरियम ग्रॅमिनियरम असल्याची माहिती मिळाली आहे. गहू, तांदूळ, मका या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. शिवाय माणसाच्या लीवरवर गंभीर परिणाम करते, या बुरशीमुळे माणसांना उटल्या होतात.
पकडण्यात आलेले दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचा दावा करत आहेत. सुरुवातीला त्यांनी खोटं सांगितलं, उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र नंतर कसून चौकशी केल्यानंतर खरं काय आहे ते सांगितलं. ही बुरशी अत्यंत धोकादायक असल्याचं या दोघांनीही कबूल केलं आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रशासन आता सतर्क झालं आहे.