TRENDING:

ट्रम्प यांच्या मनात नक्की चाललंय काय? पुन्हा पीएम मोदींचं कौतुक, भारत दौऱ्याचे दिले संकेत

Last Updated:

डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना 'महान मित्र' म्हटले, भारत दौऱ्याचे संकेत दिले, तसेच भारत-पाक सीझफायरचे श्रेय घेतले, पण भारताने हा दावा फेटाळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या व्यापार करारावर सध्या चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला 'महान मित्र' म्हणून संबोधले आहे. ट्रम्प यांनी केवळ मोदींची स्तुतीच केली नाही, तर पुढील वर्षी भारताच्या संभाव्य दौऱ्याचेही संकेत दिले आहेत.
News18
News18
advertisement

ट्रम्प यांची मोदींवर स्तुतीसुमने

शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही नेहमी बोलत असतो. ते एक महान व्यक्ती आहेत." यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर बातचीत सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या संभाव्य भारत भेटीबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान मोदींना वाटत असेल, तर मी नक्कीच भारतात येईन, आम्ही ते लवकरच निश्चित करू."

advertisement

पुन्हा रशियन तेलाचा 'पुराणा राग'

व्यापार आणि मैत्रीबद्दल बोलत असतानाही, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचा 'जुना राग' आळवला. त्यांनी दावा केला की, भारताने रशियाकडून होणारी तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात थांबवली आहे. मात्र, हा दावा करताना त्यांनी अधिक तपशील दिला नाही. यासोबतच, त्यांनी भारत-पाकिस्तान सीझफायरचे श्रेय घेण्याची कोणतीही संधी सोडली नाही.

advertisement

भारत-पाक सीझफायरवर पुन्हा दावा

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जुना दावा केला. "ते दोन्ही देश अणुशक्ती असलेले आहेत. जेव्हा ते लढायला लागले, तेव्हा आठ विमाने पाडली गेली. आधी सात होती, आता आठ आहेत. मी ते युद्ध एका दिवसात थांबवले," असा दावा त्यांनी केला. मात्र, ट्रम्प यांनी नेमक्या कोणत्या बाजूची विमाने पाडली गेली, याचा उल्लेख केला नाही.

advertisement

भारताकडून ट्रम्प यांचा दावा फेटाळला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

विशेष म्हणजे, भारताने यापूर्वीच ट्रम्प यांचा हा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती, असे भारताने ठामपणे सांगितले आहे. पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतरच भारताने स्वतःच्या निर्णयानुसार शस्त्रसंधी मान्य केली होती, असे भारताचे म्हणणे आहे. असे असतानाही ट्रम्प यांनी पुन्हा या सीझफायरचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प यांच्या मनात नक्की चाललंय काय? पुन्हा पीएम मोदींचं कौतुक, भारत दौऱ्याचे दिले संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल