मी अनेक मार्गांनी मदत केली - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प क्रेडिट घ्याला विसरले नाहीत. पुरस्कार विजेत्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना अनेक वेळा मदत केली आहे, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मी तिला अनेक मार्गांनी मदत करत आलो आहे आणि मला आनंद आहे कारण मी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
advertisement
मला पुरस्कार द्या, असं मी म्हणालोच नाही
नोबेल पारितोषिक मिळालेल्या व्यक्तीने आज मला फोन केला आणि म्हटलंय, 'तुम्ही खरोखरच पात्र आहात म्हणून मी हे तुमच्या सन्मानार्थ स्वीकारत आहे'. मला पुरस्कार द्या, असं मी म्हणालोच नाही. पण मला वाटतं की तिने... मी तिला मदत करत आहे. आपत्तीच्या वेळी व्हेनेझुएलामध्ये त्यांना खूप मदतीची आवश्यकता होती. मी आनंदी आहे कारण मी लाखो लोकांचे जीव वाचवले, असं डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
व्हाइट हाऊसने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांतता करार करत राहतील, युद्धं संपवतील आणि जीव वाचवतील. त्यांच्याकडे मानवतेचे हृदय आहे आणि त्यांच्यासारखा कोणताही व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वतही हलवू शकतो, असं म्हणत व्हाइट हाऊसने नोबेल पारितोषिक समितीवर टीका केली आहे
मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
2025 चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. त्या एक प्रसिद्ध राजकीय नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. मारिया कोरिना यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1967 रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि तिची आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या.