TRENDING:

'नरेंद्र मोदी आणि मी खास मित्र पण...' अमेरिकेची दुतोंडी भूमिका, ट्रम्प यांचा पुन्हा यूटर्न

Last Updated:

भारताने चीनच्या जवळ जाणं अमेरिकेला खुपतंय? रशियानंतर आता चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणं अमेरिकेसाठी ठरणार धोक्याचं? डोनाल्ड ट्रम्प यांची 'भाषा' अचानक कशी बदलली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

भारत आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये थोडा तणाव आला, टॅरिफमुळे हा तणाव आणखी वाढला आहे. हा तणाव वाढत असतानाच अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक यूटर्न घेतला. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची आपली मैत्री कायम राहील, असे सांगत त्यांनी भारत-अमेरिका संबंध खास असल्याचं म्हटलं आहे.

advertisement

हे बोलत असताना त्यांनी मोदी सध्या जे काही करत आहेत, ते मला आवडलेले नाही, असंही सांगायला विसरले नाहीत. मोदी भारताच्या हितासाठी अमेरिकेचं ऐकत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. भारत आणि रशियाला आपल्या काही निर्णयांमुळे गमवल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. या दोन्ही देशांचं भविष्य समृद्ध होवो असंही ते म्हणाले. या पोस्टनंतर अवघे 24 तासही उलटले नाहीत, तोवर ट्रम्प यांनी यूटर्न घेत आपलं मत बदललं.

advertisement

भारत रशियाकडून जास्त तेल खरेदी करत असल्यामुळे निराश आहे. त्यामुळे भारताने ते तेल खरेदी करु नये, असंही ट्रम्प म्हणाले. याच रागातून ट्रम्प यांनी जास्त टॅरिफ लावला होता. भारतावर जवळपास 50 टक्के टॅरिफ लावला आहे. तरीही मी असं म्हणेन की पीएम मोदी आणि भारताशी माझी मैत्री खूप चांगली आहे.

advertisement

भारताने ट्रम्प यांच्या या टीकेवर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं, मात्र व्हाईट हाऊसचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला दिशाभूल करणारं असल्याचं सांगितलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट अशा वेळी केली होती की, जेव्हा काही दिवसांपूर्वीच चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील मैत्रीपूर्ण चर्चेने जगाचे लक्ष वेधलं होतं. पीएम मोदी रशिया, चीनमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
'नरेंद्र मोदी आणि मी खास मित्र पण...' अमेरिकेची दुतोंडी भूमिका, ट्रम्प यांचा पुन्हा यूटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल