11 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू
अमेरिकेच्या असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बोहोळ इथल्या भागाला बसला आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, बोहोळ प्रांतात साधारण 33 हजार लोकवस्ती आहे. कलापेच्या पूर्व-आग्नेय दिशेला 11 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं.
डोंगराळ भागात मोठं नुकसान
advertisement
भूकंपाचे धक्के डोंगराळ भागातही जाणवले, एका गावात भूस्खलन आणि मोठ्या दगड कोसळल्याने अनेक घरांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच आपात्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जेसीबीच्या मदतीनं दगड हटवण्याचे काम सुरू आहे. बोगोमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या जोरदार धक्क्यामुळे नागरिक घाबरून जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. भूकंपाच्या तडाख्याने किमान 22 इमारतींचे मोठे नुकसान झालं. यात एका जुन्या दगडी चर्चचाही समावेश आहे. तसेच, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मुख्याध्यापकांच्या सहीचा Cheque पाहून कॅशिअरला आली भोवळ, बँकेत गोंधळाची स्थिती; 7,616 रुपयांच्या चेकची, गावभर रंगली चर्चा
Pune News: काय सांगता! कचऱ्यातून व्यवसाय उभा करून वर्षाला करोडो कमावले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली
त्सुनामीबाबत दिली मोठी अपडेट
स्थानिक भूकंपशास्त्र कार्यालयाने लेयटे, सेबू आणि बिलिरान बेटांवरील रहिवाशांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा आणि किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा दिला. समुद्राच्या पातळीमध्ये किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी त्सुनामीचा धोका नाही असंही म्हटलं आहे. मात्र खबरदारीसाठी समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्सुनामीचा धोका तपासणाऱ्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने स्पष्ट केले आहे की, या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नाही आणि कोणत्याही प्रकारची विशेष कारवाई करण्याची आवश्यकता नाही.