TRENDING:

Epstein Files Photo Leak: 'तरुणींसोबत हॉट टबमध्ये आंघोळ', बिल क्लिंटनसह मायकल जॅक्सन नको त्या अवस्थेत, दुसरा संच पब्लिश

Last Updated:

Epstein Files Photo Leak: अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी कुप्रसिद्ध फायनान्सर आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या बेकायदेशीर कृत्यांसंबंधीच्या तपासाशी संबंधित, बहुप्रतिक्षित कागदपत्रांचा दुसरा संच जारी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Epstein Files Photo Leak: अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी कुप्रसिद्ध फायनान्सर आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या बेकायदेशीर कृत्यांसंबंधीच्या तपासाशी संबंधित, बहुप्रतिक्षित कागदपत्रांचा दुसरा संच जारी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील काही महिन्यांपासून हे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी दबाव होता. ट्रम्प यांच्या पक्षाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजुने त्यांच्यावर दबाव होता. अनेक महिन्यांच्या दबावानंतर शुक्रवारी कायदेशीर मुदत जवळ आल्याने न्याय विभागाने जवळपास ३००,००० पानांची कागदपत्रं प्रसिद्ध केली.
News18
News18
advertisement

नव्याने प्रसिद्ध झालेल्या फाइल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा फारसा उल्लेख नाही, परंतु त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, संगीतकार डायना रॉस, मिक जॅगर आणि मायकल जॅक्सन यांचे काही फोटोज आहेत. यात इतर उच्च-प्रतिष्ठित व्यक्तींचा देखील समावेश आहे. यात ब्रिटनचे माजी प्रीन्स अँड्र्यू, त्यांची माजी पत्नी सारा फर्ग्युसन, अभिनेता केविन स्पेसी आणि ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांचाही समावेश आहे.

advertisement

या कागदपत्रांमध्ये काही भाग वगळण्यात आला आहे. यापैकी अनेक भाग सध्याच्या फौजदारी तपासाशी संबंधित आहे. यातील काही गैरवर्तनाची छायाचित्रे असल्यास सेन्सॉर करण्यात आली आहे. यामध्ये नग्न किंवा कमी कपडे घातलेल्या व्यक्तींची डझनभर सेन्सॉर केलेली छायाचित्रे आहे.

काही छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन महिलांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. सुरुवातीला, हे सर्व फोटो ४ सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. काही तासांनंतर, दुसरा सेट प्रसिद्ध करण्यात आला. यात एकूण ३,५०० हून अधिक फायली आहेत, ज्यामध्ये २.५ जीबी पेक्षा जास्त छायाचित्रे आणि कागदपत्रे आहेत. तथापि, हे स्पष्ट नाही की बरेच फोटो कुठे काढले गेले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

यातील एका फोटोमध्ये क्लिंटन हे शांटे डेव्हिस यांच्यासोबतही दिसत आहेत. शांटे यांनी नंतरच्या काळात जेफ्री एपस्टिनच्या विरोधात जबाब दिला होता. दुसऱ्या एका फोटोत क्लिंटन एका तरुणीला जवळ घेऊन बसले आहेत. संबंधित तरुणीने क्लिंटन यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. इतर काही फोटोंमध्ये क्लिंटन हे बाथटब, स्विमिंग पूल, बेडरुममध्ये दिसत आहे. प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनचे ही काही फोटो समोर आले आहेत. जॅक्सन एका फोटोमध्ये जेफ्री एपस्टिनसोबत देखील दिसून आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Epstein Files Photo Leak: 'तरुणींसोबत हॉट टबमध्ये आंघोळ', बिल क्लिंटनसह मायकल जॅक्सन नको त्या अवस्थेत, दुसरा संच पब्लिश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल