TRENDING:

मेस्सी भारतात अन् तिकडे अर्जेंटिनाच्या शेजारी झाली मोठी राजकीय उलथापालथ, चिलीमध्ये नेमके काय घडलं?

Last Updated:

अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेसी भारतात असतानाच शेजारच्या चिलीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उजव्या विचारसरणीचे नेते होसे अँटोनियो कास्ट यांच्या विजयानंतर चिलीच्या भविष्यातील दिशेवर चर्चा सुरू झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

सॅंटियागो: फुटबॉल स्टार लियोनेल मेसी भारत दौऱ्यावर असतानाच, त्याच्या मायदेश अर्जेंटिनाच्या शेजारील देश चिलीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. चिलीच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असून, उजव्या विचारसरणीचे नेते होसे अँटोनियो कास्ट यांनी राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे. त्यांनी सत्ताधारी डाव्या विचारसरणीच्या आघाडीच्या उमेदवार जीनैट जारा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. कास्ट यांना ५८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि विशेष म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी ही त्यांची तिसरी प्रयत्नांची फेरी होती. 1990 मध्ये लष्करी हुकूमशाहीचा शेवट झाल्यानंतर चिलीमध्ये झालेला हा सर्वात मोठा उजव्या बाजूकडील राजकीय कल मानला जात आहे.

advertisement

या निवडणुकीदरम्यान सुरक्षा, गुन्हेगारी, बेकायदेशीर स्थलांतर आणि कायदा-सुव्यवस्था हे मुद्दे पूर्णपणे केंद्रस्थानी होते. कास्ट यांनी चिलीअराजकतेकडे वाटचाल करत आहे’ असा दावा करत मतदारांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना तीव्रपणे अधोरेखित केली. विजय मिळाल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना कास्ट म्हणाले, “चिली आता गुन्हेगारीमुक्त होईल, भीतीमुक्त होईल. गुन्हेगारांचे आयुष्य बदलणार आहे. आम्ही त्यांना शोधू, पकडू, शिक्षा करू आणि तुरुंगात डांबू.”

advertisement

सँटियागो शहरात विजयाचा जल्लोष साजरा करताना कास्ट यांच्या समर्थकांच्या डोक्यावर ‘मेक चिली ग्रेट अगेन’ अशा मजकूर असलेल्या लाल टोप्या दिसून आल्या. यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कास्ट यांची वैचारिक जवळीक स्पष्टपणे समोर आली. कास्ट हे ट्रम्प यांचे उघड समर्थक राहिले आहेत आणि त्यांची धोरणेही ट्रम्प यांच्या राजकीय भूमिकेशी साधर्म्य दर्शवतात. सीमेवर भिंत उभारणे, कडक तुरुंग व्यवस्था, बेकायदेशीर स्थलांतरितांचे मोठ्या प्रमाणावर निर्वासन आणि सरकारी खर्चात कपात या धोरणांचा कास्ट ठामपणे पुरस्कार करतात.

advertisement

कास्ट यांच्या विजयानंतर चिलीच्या भूतकाळातील जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्यांनी अनेकदा हुकूमशहा ऑगस्टो पिनोशे यांचे कौतुक केले आहे. पिनोशे यांचे 1973 ते 1990 या काळातील शासन मानवी हक्कांचे उल्लंघन, जबरदस्तीने गायब करणे आणि दडपशाही यासाठी कुप्रसिद्ध राहिले आहे. कास्ट यांचे भाऊ पिनोशे सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांच्या वडिलांवर नाझी पक्षाशी संबंधित असल्याचे आरोपही झाले होते. कास्ट समर्थकांपैकी काहीजण उघडपणे म्हणताना दिसले की, “पिनोशे यांच्या काळात शांतता होती.” मात्र विरोधकांना भीती आहे की ही निवडणूक चिलीला पुन्हा त्या अंधाऱ्या आणि दडपशाहीच्या काळाकडे घेऊन जाऊ शकते.

advertisement

मात्र वास्तव असे आहे की चिली आजही दक्षिण अमेरिकेतील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो आणि अलीकडच्या वर्षांत हत्या दरात घटही नोंदवली गेली आहे. तरीसुद्धा बेकायदेशीर स्थलांतर आणि संघटित गुन्हेगारीची भीती मतदारांच्या मनावर खोलवर परिणाम करत असल्याचे दिसून आले. कास्ट यांनी सातत्याने स्थलांतरितांना विशेषतः व्हेनेझुएलातून आलेल्या लोकांना, गुन्हेगारीशी जोडून मांडले. मात्र टीकाकारांचे म्हणणे आहे की असुरक्षिततेची भीती मुद्दाम वाढवून दाखवण्यात आली. अनेक अभ्यासांनुसार परदेशात जन्मलेले लोक सरासरीने कमी गुन्हे करतात, असे आकडेवारी सांगते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
मेस्सी भारतात अन् तिकडे अर्जेंटिनाच्या शेजारी झाली मोठी राजकीय उलथापालथ, चिलीमध्ये नेमके काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल