सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर उसळलेला हा आंदोलनाचा भडका बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशी दिसून आला. किंबहुना अधिक आक्रमकपणे दिसून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार झालेल्या आंदोलकांच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी सरकारी इमारतींना आणि सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. आक्रमक आंदोलकांनी नेपाळच्या संसद भवनाला आग लावली, यात संसद भवन जळाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली...यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केलीय. नेपाळच्या सु्प्रीम कोर्टलाही आंदोलकांनी लक्ष्य केलं. नेपाळच्या सुप्रीम कोर्टालाही आंदोलकांनी आग लावली. त्यामुळे नेपाळची राजधानी काठमांडूवर धुराचे लोट दिसून आले. नेपाळच्या रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
अर्थमंत्र्याच्या छातीवर लाथा मारल्या
केवळ इमारती आणि इमारतींना आग लावण्यापुरते आंदोलक मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी ओली सरकारच्या मंत्र्यांना आणि माजी पंतप्रधानांना, त्यांच्या घरांना लक्ष्य केलं.आंदोलकांनी घरात घुसून माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना मारहाण केली. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पोडोल यांना काठमांडू इथल्या त्यांच्या घराजवळ पाठलाग करून मारहाण करण्यात आली.त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथ मारताना दिसून आला.
एक देश राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यात
आंदोलकांनी नेपाळमधील जेलला परिसरालाही धडक दिली. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रबी लामिछाने यांची सुटका करण्यात आली. यावेळी ललितपूरच्या नाखू तुरुंगातून सर्व कैदी पळून गेले.पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर केपी शर्मा ओली काठमांडूतून पळून गेलेत.हेलिकॉप्टरमधून जातानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेपाळमधून सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात आलीत. नेपाळमध्ये अराजकतेच वातावरण असून भारताचा शेजारी असलेला आणखी एक देश राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडलाय