प्रश्न – AR-15 इतकी घातक का आहे?
- AR-15 ऑटोमॅटिक रायफल आहे. यातून हल्ला करणारा एकापाठोपाठ एकापेक्षा जास्त शॉट्स मारू शकतो. याच्या मदतीने दुरून टार्गेट ठरवून गोळी चालवता येते. त्यामुळेच गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले; पण त्यात एकाचा मृत्यू झाला.
एआर-15 बंदूक हाय स्पीड फायरिंग करते. ही हँडगनच्या गोळीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने जाते. दुरूनही निशाणा साधता येतो व ती शरीराला भयंकर जखमा करते. ती गोळी डोकं किंवा छातीवर लागल्यास जीव जाऊ शकतो.
advertisement
प्रश्न – ही बंदूक अमेरिकेत लोकप्रिय का आहे?
- सामान्य जनता ही सहज खरेदी करू शकते. ही एक असॉल्ट गन आहे. तिच्यावर लोकांसाठी बंदी घातलेली नाही. त्यामुळे अमेरिकेतल्या बहुतेकशा घटनांमध्ये या बंदुकीचा वापर झाल्याचे रिपोर्ट आहेत. अमेरिकेत बंदुकीमुळे होणारे सर्वाधिक मृत्यू या एआर 15 मुळे होतात.
प्रश्न – अमेरिकेत AR-15 गन खरेदी करणं सोपं आहे का?
- ही बंदूक खरेदी करणं खूप सोपं आहे. अमेरिकेत बंदुकीची दुकानं खूप आहेत. कोणीही या दुकानात ओळखपत्र दाखवून रायफल किंवा शॉटगन खरेदी करू शकतं; पण ते बंदूक देण्याआधी थोडी पडताळणी करतात. यात खरेदीदाराचा गुन्हेगारी इतिहास व मानसिक आरोग्य या गोष्टी पाहिल्या जातात.
प्रश्न – इतर उपकरण जोडून ही बंदूक अधिक घातक बनवता येते का?
– होय, अमेरिकेत AR-15 च्या लोकप्रियतेचं एक कारण म्हणजे ते मोठ्या प्रमाणावर अपडेट करता येते. अन्य उपकरणाच्या मदतीने तिची क्षमता वाढवता येते. यात स्कोप, मोठ्या क्षमतेचं मॅगझिन आणि इतर अनेक उपकरणं जोडता येतात.
प्रश्न – या रायफलवर कधी बंदी घालण्यात आली होती का? ती कशी हटवली?
- 1994 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात ज्या प्राणघातक शस्त्रांवर बंदी घातली होती, त्यात या रायफलचा समावेश होता; पण अमेरिकेत गन उत्पादक लॉबी पॉवरफुल आहे. त्यामुळे दबाखाली ही बंदी 2004 मध्ये हटवण्यात आली.
प्रश्न – अमेरिकन कायदा गन ठेवणं मूलभूत अधिकार मानतो का?
- होय, अमेरिकन राज्यघटनेनुसार बंदूक बाळगणं हा घटनात्मक अधिकार आहे हे खरं आहे; पण कॅलिफोर्निया, इलिनॉय, मेरीलँड, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन डीसी यांसारख्या अनेक राज्यांनी अशी शस्त्रं बाळगण्यावर बंदी घातली आहे.
प्रश्न – AR-15 रायफल यूएस आर्मी वापरत असलेल्या घातक M16 सारखीच आहे का?
- AR-15 रायफल व्हिएतनाम युद्धापासून अमेरिकन सैन्य वापरत असलेल्या M16 रायफलच्या आधारावर बनवली आहे. ही रायफल शिकार किंवा स्वसंरक्षणासाठी अचूक शॉट्स मारण्यास सक्षम आहे. तिची अनेक मॉडेल्स आणि अनुकूल डिझाईनमुळे ती हिट झाली. ही घातक असल्याने नेमबाजांचं आवडतं शस्त्र बनली.
प्रश्न – अमेरिकेत AR-15 रायफलची किंमत किती?
अमेरिकेत AR-15 रायफल्सची किंमत त्यांच्या मॉडेल्सनुसार वेगवेगळी आहे. बेस मॉडेल AR-15 रायफलची किंमत 400 डॉलर्स (33,426 रुपयांपासून) सुरू होते. या रायफलची मॉडेल्स 2,000 डॉलर्स म्हणजे 1,67,133 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीला विकल्या जातात. अनेक AR-15 रायफल्स 800 डॉलर्स म्हणजेच 67 हजार ते 1,500 डॉलर्स म्हणजेच 125,349 या किमतीत मिळतात.
प्रश्न – अमेरिकेत वर्षभरात किती रायफल्स विकल्या जातात?
- अमेरिकेत दरवर्षी किती AR-15 रायफल्स विकल्या जातात याचा अचूक आकडा नाही; पण अंदाजे दोन कोटींहून अधिक जणांकडे कायदेशीररीत्या AR-15 प्रकारच्या रायफल्स आहेत.
प्रश्न - ऑटोमॅटिक गन म्हणजे काय?
- ऑटोमॅटिक गन म्हणजे अशी गन, जी प्रत्येक शॉटनंतर मॅन्युअली रीलोड न करता सलग अनेक शॉट्स फायर करू शकते.
प्रश्न – AR-15 रायफलमध्ये किती मॅगझीन ठेवता येतात?
- अनेक आधुनिक AR-15 रायफल्समध्ये उच्च क्षमतेची मॅगझीन असतात. त्यामध्ये 30 किंवा 100 राउंड्स ठेवता येतात. त्यामुळे लोड करण्यास न थांबवता सलग गोळ्या झाडता येतात.
प्रश्न - गोळीचा आकार किती असतो?
– AR15ची अनेक व्हॅरिएंट मॉडेल्स असल्याने त्याच्या काडतुसांची रेंज आणि आकारदेखील वेगवेगळे आहेत. AR-15 मध्ये 223/5.56 मिमी गोळी वापरली, तरी तिचा स्पीड व आकार घातक असतो. कारण या गोळ्या मानवी शरीराचं खूप नुकसान करू शकतात. गोळीचा फक्त पुढचा भाग शरीरात जातो. उर्वरित खालच्या भागात दारूगोळा असतो.
प्रश्न – आतापर्यंत फक्त ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्षच बंदूक विक्रीवर आळा घालण्याला विरोध करत होता?
- होय. डोनाल्ड ट्रम्प स्वतः आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने नेहमीच बंदूक सुधारणा कायद्यांना विरोध केला आहे. रिपब्लिकन-नेतृत्वाखालच्या अनेक राज्यांनी बंदूक निर्बंधांशी संबंधित उपाय रोखण्यासाठी खटले दाखल केले आहेत.