सुनीता ही नागपुरातून 4 मे रोजी बाहेर जात आहे असं सांगून घरून निघाली होती. त्यानंतर 11 मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की, मुलाला सोडून ती पाकिस्तानला गेली होती. अमृतसर बीएसएफकडून महिलेला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर नागपूर पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली.. कपिल नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच एक अधिकारी आणि दोन महिला पोलीस कर्मचारी हे अमृतसरला गेलेले आहे. अमृतसरला पोहचून कायदेशीर प्रक्रिया पार करतील .त्यानंतर सुनीता जामगडे महिलेला ताब्यात घेतील. पुढील चौकशी नागपूर पोलीस करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.
advertisement
महिलेची मानिसक स्थिती अस्थिर
कारगिल मधील शेवटचे गाव 'हुंदरमान'मध्ये तिला पाहण्यात आले होते. त्यानंतर तिला कोणीच पाहिले नाही. बराच वेळ जेव्हा सुनीता परत आली नाही. तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता सुरुवातीला नर्स म्हणून काम करत होती. त्यानंतर ती कपडे शिवण्याचं काम करायची तिची मानसिक स्थिती अस्थिर असून तिच्या नागपूरतील रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते. नागपुरातून निघताना ही तिने आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवले होते. तर मुलाला कपडे घेऊन देते असं सांगून सुनीता घरातून बाहेर गेल्याची माहिती आहे,
