TRENDING:

'आमचं पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा...' पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी

Last Updated:

ऑपरेशन सिंधूरनंतर पाकिस्तान सुधारत नाही. पाकिस्तानी अधिकारी अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला धमकी दिली. हाफिज सईदची भाषा वापरली. व्हिडीओ व्हायरल झाला आणि ट्विटरवर संतापाची लाट उसळली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ऑपरेशन सिंधूरनंतरही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेत नाही. शेपूट वाकडं ते वाकडंच असं हा व्हिडीओ ऐकून तुम्हाला वाटेल. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी सेनेचा अधिकारी थेट भारताला धमकी देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमधून संपूर्ण जगाला संदेश दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा अधिकारी दहशतवादी हाफिज सईदची भाषा बोलत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओनंतर ट्विटरवर संतापाची लाट उसळली आहे.
News18
News18
advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर केलं. 22 मिनिटात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली. पाकिस्तानचं पाणी भारताने बंद केलं, मात्र दहशतवादाला आपल्या देशातून घालवण्याचं नाव अद्यापही ते काढत नसून चीनची मागच्या दराने मदत घेण्याचे काम सुरू झाले आहे. पाकिस्तान सेनेचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट धमकी दिली.

advertisement

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद जे बोलतो तीच भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याच्या प्रतिक्रियेत त्यांनी एका जाहीर सभेत हे वादग्रस्त विधान केले. अहमद शरीफ चौधरी म्हणाले, "जर तुम्ही आमचे पाणी बंद केलं तर आम्ही तुमचा श्वास थांबवू." हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

23 एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी कराराचे काही भाग निलंबित केले असताना हे विधान करण्यात आलं होतं अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाकिस्तानला भारतातून जाणारं पाणी बंद केलं. यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. 19960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला हा करार दोन्ही देशांमधील सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे समान वाटप करावे असं या करारत म्हटलं होतं.

advertisement

भारताने वारंवार सांगितले आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. संवाद आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. पाकिस्तानने दहशतवाद्यांना थारा देऊ नये असं सांगूनही पाकिस्तानची शेपूट अजूनही वाकडीच आहे. हाफिज सईदची भाषा पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याच्या तोंडी दिसून आली आहे. ह्या व्हिडीओनंतर अनेकांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला.

मराठी बातम्या/देश/
'आमचं पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा...' पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल