TRENDING:

थायलंडमध्ये सर्व्हिस घेतली अन् पैसे दिले नाहीत, Transwomenनी भारतीयाला लाथाबुक्क्यांनी तुडवला; Viral Video

Last Updated:

Transwomen Attacked Indian Man: थायलंडमधील पट्टाया येथे एका भारतीय नागरिकावर ट्रान्सजेंडर महिलांच्या गटाने रस्त्यावरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

पट्टाया: थायलंडमधील पट्टाया येथे एका भारतीय नागरिकावर ट्रान्सजेंडर महिलांच्या गटाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, कथित लैंगिक सेवांचे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे हा वाद चिघळला.  

advertisement

ही घटना 27 डिसेंबर रोजी घडली होती. 52 वर्षीय भारतीय नागरिक राज जासुजा असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडीओंपैकी एका क्लिपमध्ये तीन ट्रान्सजेंडर महिला जासुजाकडे पैशांची मागणी करताना दिसतात. पैसे देण्यास नकार देत जासुजाने कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या महिलांनी त्यांना कारमधून ओढून बाहेर काढले.

advertisement

advertisement

यानंतर रस्त्यावरच जासुजाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. काही वेळाने घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने त्यांना सोडवले. जासुजाच्या चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागील भागावर दुखापती आढळून आल्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पट्टामाकुन रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ‘द थायगरया स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

advertisement

या प्रकरणातील एका 19 वर्षीय थाई साक्षीदाराने बचाव पथकाला सांगितले की, वॉकिंग स्ट्रीटच्या प्रवेशद्वाराजवळ एका ट्रान्सजेंडर सेक्स वर्करसोबत भारतीय नागरिकाचा वाद सुरू होता. दोघांमध्ये परस्पर पाठलाग आणि मारहाण सुरू असताना इतर ट्रान्सजेंडर महिलांनीही हस्तक्षेप करत जासुजावर हल्ला केला. साक्षीदारानुसार, ठरलेली रक्कम पूर्णदिल्यामुळे हा वाद हिंसक वळणावर गेला.

दरम्यान थायलंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जासुजा पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्यांना औपचारिक तक्रार दाखल करण्यास सांगितले जाईल. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे पट्टाया येथे यापूर्वीही भारतीय पर्यटक आणि ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर्स यांच्यातील वाद आणि हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. ‘द थायगर’च्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये एका भारतीय नागरिकावर ट्रान्सजेंडर महिलेने गैरवर्तनाच्या आरोपाखाली हल्ला केला होता. ऑक्टोबरमध्येही तीन ट्रान्सजेंडर महिलांनी दोन भारतीय पर्यटकांवर हल्ला करून सुमारे 69 हजार रुपयांच्या किमतीचे साहित्य लुटल्याची घटना घडली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/विदेश/
थायलंडमध्ये सर्व्हिस घेतली अन् पैसे दिले नाहीत, Transwomenनी भारतीयाला लाथाबुक्क्यांनी तुडवला; Viral Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल