जवळपास 32 हजार फूट उंचीवर जाऊन विमान गिरट्या घालत राहिली, 15-20 मिनिटांनंतर पुन्हा पायलटने लॅण्डिंगसाठी प्रयत्न केले. यावेळी मनावर जास्त दडपण होतं. मात्र पायलटने यशस्वीरित्या लॅण्डिंग केलं आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान पहिलं लॅण्डिंग हुकल्याचं कारण आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
राजधानी जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सायंकाळी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने प्रवाशांना थरारक अनुभव दिला. कोलकात्याहून जयपूरकडे येणारी इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-394 लँडिंगच्या शेवटच्या क्षणी अचानक अडचणीत आली. त्यामुळे पायलटला पुन्हा टेक-ऑफ करून विमान १५ मिनिटे आकाशात फिरवावे लागले. या विमानात १०० पेक्षा जास्त प्रवासी होते. मात्र पायलटच्या सूज्ञ निर्णयामुळे अखेर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षित उतरले.
advertisement
काय घडलं नेमकं?
ही फ्लाइट संध्याकाळी नियोजित वेळेनुसार ती 6.13 वाजता जयपूर विमानतळावर उतरणार होती. पण लँडिंगच्या अगदी शेवटच्या क्षणी रनवेवर अडथळा आल्याने पायलटने तातडीने पुन्हा टेक-ऑफ केले. त्यानंतर विमानाने आकाशात होल्डिंग पॅटर्नमध्ये 15 मिनिटे उड्डाण केले. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावरही अनेकांनी आपली चिंता व्यक्त केली. अखेर सायंकाळी 6.28 वाजता विमान सुखरूप उतरले.
अधिकाऱ्यांचे म्हणणे
एअरपोर्ट प्रशासनाने सांगितले की रनवेवर आलेल्या अडथळ्यामुळे ही अडचण निर्माण झाली. जयपूर विमानतळाच्या रनवेवर अलीकडेच देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अशा घटना वाढत आहेत. विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
इंडिगोची प्रतिक्रिया
इंडिगोने निवेदनात सांगितले, फ्लाइट 6E-394 ला तांत्रिक अडचणीमुळे गो-अराउंड करावे लागले. मात्र सर्व सुरक्षा नियम पाळून प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.
गेल्या चार दिवसांत जयपूर विमानतळावर ही दुसरी वेळ आहे की फ्लाइटला लँडिंगच्या आधी गो-अराउंड करावे लागले. शनिवारच्या एका उड्डाणालाही हवामान आणि रनवेच्या कारणामुळे असे करावे लागले होते.