हायफामधील ऑईल रिफायनरी आणि पॉवर प्लांट या मिसाइल हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. सोशल मीडियावर या हल्ल्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये मिसाइलच्या स्फोटानंतर मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ उठताना दिसत आहेत. हायफानजिकच्याच तमरा या अरब बहुल शहरामध्ये एक दोन मजली इमारत मिसाइलमुळे कोसळली असून, यात 1 नागरिकाचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले आहेत.
advertisement
Israelला करायचा होता राजकीय मर्डर, अयातुल्ला अली खामेनेई यांना उडवण्याचा कट; Death Mission कोणामुळे थांबले?
इस्रायल लष्कराच्या रेडिओने दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवच्या अनेक भागांमध्ये मिसाइल हल्ला करण्यात आला. एका इमारतीवर थेट प्रहार झाल्याची माहिती आहे. पश्चिम यरुशलम आणि बेन गुरियन विमानतळाजवळही भीषण स्फोट झाले. स्थानिक मीडिया अहवालानुसार, या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून 499 जखमी आहेत. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. तेहरानमधील इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांनाच टार्गेट केलं.
इराणचा हेतू जगासमोर आला आहे. त्यामुळे आमच्याकडे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. हे संपूर्ण जगासाठी धोक्याचं आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. या दोघांच्या संघर्षाचे परिणाम जागतिक मार्केटवरुन दिसून येत आहेत. चांदी 6000 रुपयांनी घसरली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. क्रूड ऑइल महाग होण्याची शक्यता आहे.
