TRENDING:

खामेनी खल्लास! ऑपरेशन एपिक फ्युरी'ने इराणचा हुकूमशहा मातीत गाडला,अमेरिकेने कसं रचलं चक्रव्हूय?

Last Updated:

खामेनीला संपवण्यासाठी महिन्याभरापूर्वी अमेरिका आणि इस्त्रायल मध्ये ‘एपिक फ्युरी’ नावाचे गुप्त  ऑपरेशन राबवले होते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
What is Operation Epic Fury : आयातुल्ला अली खामेनींचं अभेद्य सुरक्षा भेदण्यासाठी अमेरिकेनं गेल्या काही दिवसांपासून करडी नजर ठेवली होती.  सॅटेलाईट्स आणि गुप्तचरांकडून इंत्यभूत माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी राबवलं आणि आपल्या शत्रूचा अचूक वेध घेतला.
News18
News18
advertisement

तेहरानच्या मध्यभागी वसलेले ‘बैत-ए रहबारी’ नावाचा किल्ला भीषण हल्ल्यात उध्वस्त झाला आहे. अमेरिकेचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात सगळं काही नष्ट झालं आहे.  शुक्रवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच नेता. आयतूल्ला खोमेनी ठार झाला. पण या हल्ल्यापूर्वी इथे परिस्थिती काही वेगळी होती. हाउस ऑफ लीडरशिप नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच अभेद्य किल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी राहत होता. इथूनच तो आपल्या सहकाऱ्यांनी आदेश देत होता.

advertisement

‘एपिक फ्युरी’ नावाचे गुप्त  ऑपरेशन

इराणच्या सत्तेची सगळी सूत्रं खोमेनी इथूनच हलवत होता. अमेरिका आणि इस्त्रायलकडून नाकाबंदी नंतरही खोमेनी यांनी आपल्या समर्थकान समोर इथूनच जाहीर भाषण केलं होतं.त्यामुळे बैत-ए रहबारी हे अमेरिका आणि इस्रायलच्या टार्गेटवर होते. खोमेनीला संपवण्यासाठी महिन्याभरापूर्वी अमेरिका आणि इस्त्रायल मध्ये ‘एपिक फ्युरी’ नावाचे गुप्त  ऑपरेशन राबवले होते.

advertisement

ऑपरेशन कसे राबवले?

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलच्या मोसादने संयुक्त पणे हे मिशन सुरू केले होते. त्यांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे इराणचा सर्वोच नेता खोमेनीचा खातमा करणे. खोमेनीच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते. त्यासाठी सॅटेलाइट्सपासून तर गुप्तचरांपर्यंत यंत्रणा कामाला लागली होती. . बैत-ए रहबारीमध्ये सुरू असलेली माहिती गोळा केली जात होती. खोमेनीची सुरक्षा कशी भेदायची याची तयारी केली जात होती. पण ते काम काही सोपे नव्हते.

advertisement

खोमेनीच्या संरक्षणासाठी चार हजार स्पेशल गार्ड

इराणच्या सैन्याचा गराडा खोमेनी भोवती होता. बैत-ए रहबारीमध्ये मोठ मोठी बंकर्स तयार करण्यात आली होती. अमेरिकेच्या गुप्तचरांना सुगावा लागू नये म्हणून कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जात नव्हता. खोमेनीच्या संरक्षणासाठी चार हजार स्पेशल गार्ड तैनात करण्यात आले होते.

गुप्तचरांनी खोमेनीला अचूक हेरलं

पण अमेरिका आणि इस्त्रायलच्या गुप्तचरांनी खोमेनीला अचूक हेरलं. पहाटेच्या वेळी त्यांनी डाव साधला. एकाचवेळी लढाऊ विमाने आणि क्षेपणस्त्रांनी बैत-ए रहबारीवर जणू आकाशातून आग ओकली. क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा मारा केला. इराणच्या रडारला चकवा देत भीषण हल्ला केला. टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी तळघर उध्वस्त केले. कुणाला काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. अमेरिका आणि इस्त्रायलचा हा हवाई हल्ला म्हणजे जणू आकाशातून मृत्यू अवतरला होता.

advertisement

दोन्ही देशांना ऑपरेशन केलं यशस्वी 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोकणातील सर्वात मोठा शिमगा,रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी,काय आहे परंपरा?
सर्व पहा

जवळपास तीन दशकाहून अधिक काळ इराणवर खोमेनीची सत्ता होती. इराणला अण्वस्त्र सज्ज करण्याचा चंग खोमेनी यांनी बांधला होता. रशिया आणि चीनच्या मदतीने इराणने अण्वस्त्र सज्जते साठी प्रोग्राम सुरू केला होता आणि त्याचीच भीती अमेरिका - इस्त्रायलला वाटत होती. इराणमधील सत्ता उलथऊन टाकणे किवा खामेनीला संपवणे हेच अमेरिका आणि इस्रायलचे लक्ष होते. शुक्रवारी या दोन्ही देशांना ऑपरेशन यशस्वी केले.

मराठी बातम्या/विदेश/
खामेनी खल्लास! ऑपरेशन एपिक फ्युरी'ने इराणचा हुकूमशहा मातीत गाडला,अमेरिकेने कसं रचलं चक्रव्हूय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल