TRENDING:

Iran US Conflict: ''Welcome To Hell! दोन पायांवर आलात, पण चार खांद्यांवरच परत जाल'', इराणची अमेरिकेला धडकी भरवणारी फोटोसह धमकी

Last Updated:

Iran Israel War: अमेरिका इराणविरोधात आता जमिनी कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. इराणने अमेरिकेला धडकी भरवणारी धमकी दिली आहे. तुम्ही इराणमध्ये दोन पायांवर याल, पण जाताना चार खांद्यांवर जाणार असल्याचं इराणने म्हटले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारुन जवळपास महिना झाला आहे. या एक महिन्यात इराणने दोन्ही देशांच्या नाकी नऊ आणलं आहे. इराणच्या कडव्या प्रतिकारामुळे युद्ध लांबलं असून जगात चिंतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे या युद्धात निर्णायक टप्पा गाठण्यासाठी अमेरिका इराणविरोधात आता जमिनी कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. अशातच इराणने अमेरिकेला धडकी भरवणारी धमकी दिली आहे. तुम्ही इराणमध्ये दोन पायांवर याल, पण जाताना चार खांद्यांवर जाणार असल्याचं इराणने म्हटले आहे.
''Welcome To Hell! दोन पायांवर आलात तर चार खांद्यांवरच परत जाल'', इराणची अमेरिकेला धडकी भरवणारी फोटोसह धमकी
''Welcome To Hell! दोन पायांवर आलात तर चार खांद्यांवरच परत जाल'', इराणची अमेरिकेला धडकी भरवणारी फोटोसह धमकी
advertisement

पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. इराणचे सरकारी मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'तेहरान टाइम्स'ने आपल्या पहिल्या पानावर 'वेलकम टू हेल' (Welcome To Hell) अशा मथळ्याखाली अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे. "जर अमेरिकन सैनिकांने इराणच्या जमिनीवर पाऊल ठेवले, तर ते जिवंत परतणार नाहीत, तर केवळ शवपेट्यांमध्येच (Coffins) परत जातील," अशा कडक शब्दांत इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

advertisement

अमेरिकेचा 'ग्राउंड ऑपरेशन'चा प्लॅन काय?

वॉशिंग्टनमध्ये सध्या इराणमधील अणू प्रकल्पांना लक्ष्य करण्यासाठी 'लिमिटेड ग्राउंड ऑपरेशन'वर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील विशेष मोहिमेसाठी मर्यादित सैन्य तैनात करण्यात रस दाखवल्याचे समजते. इराणचा उच्च संवर्धित युरेनियमचा साठा जमिनीखालील खोल सुरक्षित ठिकाणावर असल्याने, तो नष्ट करण्यासाठी केवळ हवाई हल्ले पुरेसे नसून जमिनीवरून सैन्य कारवाई करणे आवश्यक असल्याचे अमेरिकन लष्करी तज्ज्ञांचे मत आहे.

advertisement

इराणचा 'मास्टर प्लॅन' आणि सज्जता

'तेहरान टाइम्स'च्या पहिल्या पानावर शस्त्रसज्ज सैनिक विमानाकडे कूच करत असल्याचे चित्र छापून इराणने आपण या आव्हानांना तयार असल्याचे म्हटले. इराणने म्हटले आहे की, अमेरिकेची ही कारवाई त्यांच्यासाठी एखाद्या 'दलदली'सारखी ठरेल, ज्यात अमेरिकन सैन्य पूर्णपणे रुतून बसेल. या युद्धामुळे केवळ लष्करीच नव्हे, तर जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक संकट ओढवेल, असा इशाराही देण्यात आला आहे. १९७९ च्या क्रांतीचा आवाज मानल्या जाणाऱ्या या वर्तमानपत्रातील इशारा म्हणजे थेट इराणी राजवटीचाच अधिकृत संदेश मानला जात आहे.

advertisement

'तेहरान टाइम्स' हे वृत्तपत्र इराणच्या सरकारकडून नियंत्रित केले जात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या वृत्तपत्रातील बातमी, लेख, भूमिका या इराण सरकारचीच अधिकृत भूमिका अथवा त्याच्याशी सुसंगत असल्याचे म्हटले जाते.

advertisement

इराण अमेरिकन-इस्रायली सैन्याचा मुकाबला कसा करणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

वृत्तानुसार, इराणची भूदलाची लष्करी क्षमता अत्यंत भक्कम आहे. अमेरिका-इस्रायलने जमिनी युद्ध केल्यास त्यांना महागात पडू शकते. प्रदेशातील भौगोलिक रचनाही इराणी सैन्याला फायदेशीर ठरेल. त्याशिवाय इराणवर जमिनी युद्ध सुरू झाल्यास इराणचा पाठिंबा असलेले विविध सशस्त्र दलही अमेरिका-इस्रायलविरोधात मैदानात उतरू शकतात. यामध्ये हिज्बुल्लाह, हुती सारख्या संघटना आहेत. त्याशिवाय, अमेरिका-इस्रायलविरोधातील सशस्त्र संघटना इराणच्या बाजूने मैदानात उतरू शकतात. त्यामुळे ही जमिनी युद्ध फक्त इराणच्या सीमेवर नव्हे तर इतर ठिकाणीदेखील पेटण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: ''Welcome To Hell! दोन पायांवर आलात, पण चार खांद्यांवरच परत जाल'', इराणची अमेरिकेला धडकी भरवणारी फोटोसह धमकी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल