इस्त्रायल- इराण हा संघर्ष वेळीच थांबला नाही तर त्याची झळ जागाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसेंदिवस हा संघर्ष चिघळत चालला आहे. इस्त्रायलनं इराणाच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ले करुन ते जमिनदोस्त केले. अण्वस्त्र बनवण्याच्या इराणच्या मनसुब्याला इस्त्रायलनं सुरुंग लावला आहे. पण या संघर्षात भारतीय गुप्तचर संस्था रॉ अर्थात रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग चर्चेत आलं आहे.
advertisement
रॉ चा खरा फोकस हा पाकिस्तान आणि चीनवर
इस्त्रायल प्रमाणेच भारतीय गुप्तचर संस्था रॉ अर्थात रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंगनं पाकिस्तानचा अण्वस्त्र बनवण्याची योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1968 साली रॉची स्थापना केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर गोपनीय माहीत गोळा करण्याची जबाबदारी रॉवर सोपवण्यात आली होती. पण रॉ चा खरा फोकस हा पाकिस्तान आणि चीनवर होता.
...तर पाकिस्तानकडे नसते अणू बॉम्ब
पाकिस्तान काहुटामध्ये अण्वस्त्र तयार करण्याच्या तयारीत असल्याची खबर रॉच्या गुप्तहेरांना मिळवली होती. रॉचे गुप्तहेर पाकिस्तानात तळ ठोकून होते. काहुटाच्या अण्वस्त्र प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी संशोधकांच्या केसांचे नमुने रॉच्या गुप्तहेरांनी हेयर कटिंग सैलूनमधून मिळवले होते. त्या केसांच्या परिक्षणात रेडिएशन आढळून आलं होतं.त्यामुळे पाकिस्तान काहुटात अणुबॉम्ब तयार करत असल्याची रॉची खात्री झाली होती. त्यानंतर रॉ गुप्तहेरांनी काहुटातील अण्वस्त्र केंद्राचा नकाशाही मिळवला
पाकिस्तानातील रॉच्या गुप्तहेरांचा घात
पण त्याच दरम्यान देशात सत्तांतर झालं आणि जनसंघाच्या मदतीनं मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय फायद्यासाठी रॉचा वापर करीत असल्याचा मोरारजी देसाईंना संशय होता.त्यामुळे पंतप्रधान होताचं मोरारजी देसाईंनी रॉच्या बजेटला कात्री लावली. एवढचं काय पण मोरारजी देसाईंनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल झिया उल-हक यांना अनौपचारिक गप्पात भारताला पाकच्या काहुटा अण्वस्त्र प्रकल्पाची माहिती मिळाल्याचं सांगितलं, त्यानंतर पाकिस्तान सावध झालं. त्यानंतर पाकिस्तानातील रॉच्या गुप्तहेरांचा घात झाला.
