मिळालेल्या माहितीनुसार, आयएएफच्या डझनभर फायटर विमानांनी इराणवरील हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. ज्यात इस्त्रायलने इराणच्या विविध भागातील अण्वस्त्र ठिकाणांसह डझनभर लष्करी तळांवर हल्ले केले.
सध्याच्या घडीला इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ आहे. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणातील विनाशकारी शस्त्रे इस्रायल राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत, याच कारणातून इस्त्रालयने इराणवर हल्ला केला आहे. त्यासाठी इस्त्रालयने भारतीय स्टाइलचा वापर केला असून मोक्याची लष्करी तळं आणि अण्वस्त्र ठिकाणांना टार्गेट केलं आहे.
advertisement
पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती. ज्यात शेकडो दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. असाच पॅटर्न इस्त्रायलने देखील वापरला आहे. इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांना इस्त्रालयने टार्गेट केलं आहे.
या हल्ल्यानंतर इराणने देशात आणीबाणी जाहीर केली आहे, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणमधील केरमानशाह आणि लोरेस्तानसह अनेक प्रांतांमध्ये आणि राजधानी तेहरानच्या अनेक भागात स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्याला इराण काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इराणने आक्रमक भूमिका घेतली तर जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होऊ शकते.
