इस्त्रायलची राजधानी तेल अवीवपासून उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्यात आले आहे. इराणचे काही मिसाईल टार्गेटपर्यंत पोहोचली. तर काही मिसाईल इस्रायली डिफेन्स फोर्सने हवेतच पाडली. या संपूर्ण हल्ल्यात ६० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा इराणमध्ये हवाई हल्ले सुरू केले आहेत. राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. शनिवारी सकाळी २०० इस्रायली लढाऊ विमानांनी इराणमधील सहा ठिकाणांवर हल्ला केला.
advertisement
इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा इराणी अणुशास्त्रज्ञ आणि २० लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. शिवाय यात चार प्रमुख लष्करी कमांडर देखील होते.
शुक्रवारी इस्रायली सैन्याने इराणी हवाई दलाच्या दोन तळांवर हल्ला केला होता. यामध्ये हमादान एअरबेस (पश्चिम इराण) आणि तब्रिझ एअरबेस (वायव्य-पश्चिम) या ठिकाणांचा समावेश होता. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) म्हटले आहे की त्यांनी या तळांवरून सोडलेले मिसाईल आणि ड्रोन आम्ही पाडले आहेत.
एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, जर कोणताही देश इस्रायलला मदत करत असेल तर इराण त्या देशाच्या प्रादेशिक लष्करी तळांना लक्ष्य करेल. कोणाचेही नाव न घेता, त्यांनी थेट अमेरिकेला हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. ते म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला बदला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.' यापूर्वी, अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला होता की अमेरिकेने इराणने डागलेली क्षेपणास्त्रे थांबवण्यास मदत केली.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अल खोमेनी यांनी या हल्ल्याला 'प्रत्युत्तर' म्हटलं. 'झियोनिस्ट' राजवटीला त्यांच्या गुन्ह्याची किंमत मोजावी लागेल. आता 'हिट अँड रन'चा खेळ चालणार नाही,' असा इशाराही खोमेनी यांनी दिला.
