TRENDING:
LIVE NOW

Israel Vs Iran Live: इराणची उघडी धमकी! मिडल ईस्टमधील अमेरिकेची सर्व तळे आता निशाण्यावर

Last Updated:

Israel Vs Iran Live Update: जगाची धडधड वाढली! अखेर युद्धाचा भडका उडाला; इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला, क्षेपणास्त्र डागले. एकीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना आता इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसंघर्ष सुरू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement

Israel Vs Iran war Live Update: ज्याची भीती संपूर्ण जगाला वाटत होती, अखेर तेच घडलं आहे. मध्य-पूर्वेत युद्धाचा वणवा पेटला असून इस्रायलने इराणवर थेट आणि मोठा हल्ला केला आहे. शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरे भीषण स्फोटांनी हादरली आहेत. "आम्ही इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहोत," असं अधिकृत निवेदन इस्रायलने जारी केलं असून, या हल्ल्यामुळे आता संपूर्ण जगात युद्धाला तोंड फुटलं आहे.

News18
News18
advertisement
Feb 28, 20264:08 PM IST

इराणचा इस्रायलवर हल्ला

Feb 28, 20264:00 PM IST

इराणच्या हल्ल्यात सौदीमध्ये एकाचा मृत्यू

Reutersच्या वृत्तानुसार United Arab Emiratesची राजधानी Abu Dhabi येथे इराणकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आले. मात्र या घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एअर डिफेन्स सिस्टिमने हल्ला निष्फळ ठरवला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राचे अवशेष खाली पडल्याने एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांनंतर आखाती देशांमध्ये धोका वाढला असून अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Feb 28, 20263:58 PM IST

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर बहरेनमध्ये दहशतीचे वातावरण, नागरिक घाबरून रस्त्यांवर धावताना दिसले

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर Bahrainमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तांनुसार हल्ल्याची बातमी पसरताच नागरिक घाबरून रस्त्यांवर धावताना दिसले. अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केल्यानंतर संपूर्ण परिसरात सायरन वाजू लागले आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. आखाती प्रदेशातील अनेक देशांमध्ये सतर्कतेचा इशारा वाढवण्यात आला असून पुढील हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
Feb 28, 20263:45 PM IST

इराणमध्ये शाळा–महाविद्यालये बंद, सरकारी कार्यालये अर्ध्या क्षमतेने सुरू

Supreme National Security Councilने निवेदन जारी करत म्हटले आहे की, देशातील परिस्थिती लक्षात घेता शाळा आणि विद्यापीठे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील. सरकारी कार्यालये सध्या 50 टक्के क्षमतेने कार्यरत राहतील, तर बँक सेवा सुरूच राहणार आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता नाही आणि सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांतता राखावी आणि सरकारी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Feb 28, 20263:36 PM IST

इराणने 7 देशांवर हल्ला केल्याचा दावा

इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मिडल ईस्टमध्ये असलेली सर्व अमेरिकन आणि इस्रायली तळे आता वैध लक्ष्य आहेत आणि इराणची पोहोच सर्व अमेरिकन बेसपर्यंत आहे. Reutersच्या वृत्तानुसार इराणने स्पष्ट केले आहे की या युद्धाला कोणतीही मर्यादा नसेल आणि प्रत्युत्तर कारवाई दीर्घकाळ चालेल. दरम्यान वृत्तांनुसार Riyadh (सौदी अरेबियाची राजधानी) येथे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा आहे की इराणने एकाच वेळी अनेक देशांच्या दिशेने हल्ला केला असून त्यामध्ये Jordan, Israel, United Arab Emirates, Kuwait, Saudi Arabia, Bahrain आणि Qatar यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
Feb 28, 20263:01 PM IST

इराणची उघडी धमकी – मिडल ईस्टमधील अमेरिकेची सर्व तळे आता निशाण्यावर

इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आता मिडल ईस्टमध्ये असलेली अमेरिका आणि इस्रायलची सर्व लष्करी तळे आणि हितसंबंध हे वैध लक्ष्य ठरले आहेत. Al Jazeeraशी बोलताना त्या अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यानंतर आता कोणतीही ‘रेड लाईन’ उरलेली नाही आणि प्रत्युत्तर कारवाईसाठी कोणतीही वेळेची मर्यादा राहणार नाही. त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिका आणि इस्रायल यांनी युद्धाची सुरुवात केली असून त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील.
advertisement
Feb 28, 20262:19 PM IST

नेतन्याहू यांचं इराणमध्ये सत्ताबदलाचे आवाहन

इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांदरम्यान इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी तेहरानमध्ये सत्ताबदलाचे आवाहन केले आणि इराणी लोकांना सरकारविरुद्ध उठण्याचे आवाहन केले. नेतन्याहू यांनी सांगितले की संयुक्त कारवाईचा उद्देश इराणी लोकांना त्यांचे स्वतःचे भविष्य ठरवण्याची संधी देणे आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि सांगितले की इराणी सरकारला अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत आणि ही कारवाई जागतिक सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
Feb 28, 20262:08 PM IST

सीरिया आणि येमेन युद्धात सहभागी

सीरिया आणि येमेन देखील या युद्धात सामील झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
Feb 28, 20262:08 PM IST

इराणच्या बुशेहर बंदरावर हल्ला

इराणच्या बुशेहर बंदरावर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांदरम्यान हल्ला करण्यात आला, असे राज्य माध्यमांनी शनिवारी सांगितले. तथापि, वीज प्रकल्पाचे नुकसान झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
Feb 28, 20262:02 PM IST

ईराणचा इस्रायलवर पलटवार, 70 मिसाइल्सने हल्ला, तेल अवीवर आणीबाणी

इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 70 मिसाइल्स डागले आहेत. तेल अवीव इथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
Feb 28, 20261:58 PM IST

इस्रायली हल्ल्यांनंतर, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या प्रमुखांचं मोठं विधान

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाच्या प्रमुखांनी म्हटले, “आम्ही तुम्हाला इशारा दिला होता. आता तुम्ही अशा मार्गावर निघाला आहात ज्याचा अंत तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे.”
Feb 28, 20261:56 PM IST

बहरीनमधील अमेरिकन दूतावासाला अलर्ट

मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बहरीनमधील अमेरिकन दूतावासाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आदेश दिले आहेत. दूतावासाने अमेरिकन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा, घराबाहेर पडू नये आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, कतारमधील अमेरिकन दूतावासाने असाच इशारा जारी केला होता. वाढत्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेश हाय अलर्टवर आहे.
advertisement
Feb 28, 20261:49 PM IST

Israel Vs Iran Live: युद्धामुळे 5 देशांवर भीतीचं सावट

युद्धाची दाहकता पाहता ब्रिटन, अर्जेंटिना, न्यूझीलंड, युक्रेन आणि आइसलँड यांसारख्या देशांनी तेहरानमधील आपले दूतावास रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. कतारमधील अमेरिकन दूतावासानेही आपल्या कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Feb 28, 20261:49 PM IST

इराणचा इस्रायल आणि अमेरिकेला थेट इशारा

हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. “हल्ल्याची सुरुवात शत्रूने केली असली, तरी या युद्धाचा शेवट इराणच करेल,” असा इशारा इराणच्या लष्करी नेतृत्वाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इराणने आपली सर्व विमानसेवा बंद केली आहे. दुसरीकडे, इस्रायलमध्येही आणीबाणी घोषित करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित बंकरमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Feb 28, 20261:49 PM IST

Israel Vs Iran Live: महिन्याभरापासून सुरू होती हल्ल्याची तयारी?

हा केवळ एक छोटा हल्ला नसून, तो अनेक महिन्यांपासून आखलेला मोठा कट असल्याचे इस्रायली सूत्रांनी सांगितले आहे. अमेरिकेनेही या मोहिमेत इस्रायलला पूर्ण साथ दिली असून, हे हल्ले किमान पुढील चार दिवस सुरू राहू शकतात, असे संकेत मिळाले आहेत. इराकच्या आकाशातही क्रूझ मिसाइल्सचा संचार वाढल्याने इराकने आपली हवाई हद्द (Airspace) तात्काळ बंद केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/विदेश/
Israel Vs Iran Live: इराणची उघडी धमकी! मिडल ईस्टमधील अमेरिकेची सर्व तळे आता निशाण्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल