स्फोटाची आणि रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, क्वेट्टाहून पेशावरला जाणारी ट्रेन रुळावरून घसरली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे कारण आणि स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे. जीवितहानी झाली नसल्याने चिंता करण्याचे कारण नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे.
advertisement
जाकोबाबादमध्ये क्वेट्टा-पंजाबला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने लक्ष्य केल्याचा दावा बलुच रिपब्लिकन गार्ड्सने केला आहे, ज्यामुळे ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
प्रवासी रेल्वेतून खाली उतरले असून गोंधळ दिसत आहे. आधीच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना हा भीषण अपघात झाला असून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे रेल्वेही रुळावरुन घसल्याची टीका सोशल मीडियावर सुरू आहे.