नाइट शिफ्टमध्ये करायचा हत्या
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोषी नर्सने शांत झोप लागणारी आणि वेदनाशामक औषधे वापरून आपल्या रुग्णांची हत्या केली. ज्या रुग्णांची हत्या करण्यात आली, त्यापैकी बहुसंख्य वृद्ध होते. अहवालानुसार, या नर्सने रात्रीच्या नाइट शिफ्ट दरम्यान आपला कामाचा भार कमी करण्यासाठी या रुग्णांना टार्गेट केलं होतं. रात्रीभर जास्त मेहनत करावी लागू नये आणि रुग्ण लवकर झोपी जावेत, या उद्देशाने नर्सने ही हत्यासत्र सुरू केल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे आहे.
advertisement
झोपेचं आणि वेदनाशामक इंजेक्शनचा ओवरडोस
या नर्सचे नाव गुप्त ठेवण्यात आलं असून त्याची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, तपासामध्ये असे उघड झाले आहे की, त्याने अनेक रुग्णांना मॉर्फिन आणि मिडाझोलम यांसारख्या औषधांची आवश्यकतेपेक्षा जास्त मात्रा दिली. ही औषधे इतकी तीव्र होती की त्यांचा अति डोस रुग्णांचा जीव घेऊ शकत होता. डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन येथील एका रुग्णालयात या हत्या झाल्या होत्या.
तपास आणि शिक्षेचा कालावधी
या आरोपी पुरुष नर्सला २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याने २००७ मध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि २०२० पासून तो याच रुग्णालयात कार्यरत होता. न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेनुसार, जर्मनीतील कायद्यानुसार त्याला किमान १५ वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. सध्या तपासकर्ते या नर्सशी संबंधित असलेल्या इतर संशयित प्रकरणांचीही चौकशी करत आहेत, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाएल्स हेगेल प्रकरणाची आठवण
जर्मनीत घडलेल्या या भीषण घटनेमुळे २०१७ मधील नाएल्स हेगेल प्रकरणाची आठवण झाली आहे. २०१७ मध्ये नाएल्स हेगेल या पुरुष नर्सला जर्मनीतील दोन रुग्णालयात तब्बल ८५ रुग्णांची हत्या केल्याबद्दल २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कामाचा ताण आणि मनोरुग्णता यातून त्याने हे कृत्य केले होते. त्यामुळे या नवीन प्रकरणातही आरोग्य क्षेत्रातील नैतिकतेवर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
