महिलांचे कपडे बदलताना, सनबाथ घेताना तसंच शरीर संबंध ठेवतानाचे फोटो या फेसबुक ग्रुपवर शेअर करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो महिलांचे पती किंवा त्यांच्या बॉयफ्रेंडनेच फेसबुक ग्रुपवर अपलोड केल्याचं तपासात समोर आलं आहे. फोटो अपलोड केल्यानंतर त्यावर अश्लिल कमेंट येत होत्या. या सर्व कमेंटचाही पोलीस अधिकारी तपास करत आहेत.
advertisement
सायबर पोलीसही हादरले
इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर आल्यामुळे इटलीमध्ये खळबळ माजली आहे. 'माझ्या करिअरमध्ये मी सोशल मीडिया ग्रुपवर इतकं घृणास्पद कृत्य पाहिलं नाही', असं सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या इटलीच्या पोस्टल पोलिसांच्या उपसंचालक बारबरा स्ट्रॅपाटो म्हणाल्या.
हे प्रकरण समोर आल्यानंतर मेटा आणि इटालियन पोलिसांना ग्रुप बंद करण्याची मागणी करणाऱ्या 2 हजारांहून अधिक तक्रारी आल्या, त्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू झाला. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर 20 ऑगस्ट रोजी हा ग्रुप बंद करण्यात आला.
ग्रुप बंद करण्याआधी अज्ञात ऍडमिननी ग्रुप जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. 'आम्ही एक नवीन खाजगी ग्रुप तयार केला आहे', असं ऍडमिननी सांगितलं आहे, त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना हा ग्रुप आता टेलिग्रामवर सुरू झाल्याचा संशय आहे. ग्रुप बंद झाला असला तरीही प्रायव्हेट फोटो आणि त्यांचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, त्यामुळे याचं नियंत्रण करणं तपास यंत्रणांनाही अशक्य झालं आहे.
इटलीमध्ये 2019 पासून या प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कायदा आहे. या कायद्यानुसार संमतीशिवाय प्रायव्हेट फोटो शेअर केल्याबद्दल दोषींना 6 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षेची तरतुद आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे प्रकरण फक्त सूड घेण्यापुरतं मर्यादित नसल्याचं मेलोनी म्हणाल्या आहेत.