TRENDING:

Nepal Politics: आता बस्स, खुर्च्या खाली करा...Gen Z ने सरकार उलथवलं, तरुण पोरांचा नायक बालेन शाह कोण आहेत?

Last Updated:

Nepal Gen Z Protest: नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवलीय. त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली. तसेच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांची घरांवरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येतंय. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. मात्र तरूणामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले बालेन शाह कोण या विषयी जाणून घेऊया
Balen Shah
Balen Shah
advertisement

बालेन शहा हे तरूणाई प्रचंड लोकप्रिय असून अनेकांचे आदर्श आहे. टाईम मॅगझिन आणि न्यूयॉर्क टाईम्सनेदेखील त्यांची दखल घेतली आहे. तरूणांमध्ये लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स अनेकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांची जीवनशैली, विचारसरणी आणि व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्यामुळे जनरेशन-झेड आंदोलनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

advertisement

सिव्हिल इंजिनियर ते रॅपर 

बालेन शाह यांनी सिव्हिल इंजिनियर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते रॅपर झाले आणि अखेर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काठमांडूचे महापौर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी विविध विषयावर भाष्य करत तरुणाईचा विश्वास संपादन केला आहे. सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे अनेकदा एखादा विषय झपाट्याने ट्रेंड झाले आहे.

advertisement

भारतीय सिनेमाचा केला होता विरोध?

2023 मध्ये रामायणाच्या कथेतून प्रेरित ‘आदिपुरुष’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यावेळी काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी या चित्रपटातील काही संवादांवर आक्षेप घेतला होता आणि ते संवाद चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली होती. एवढच नाही तर असे न केल्यास नेपाळ आणि काठमांडूमध्ये कोणताही भारतीय चित्रपट चालू देणार नाही, असा इशारा देखील दिला होता .

advertisement

आंदोलनाचे केंद्र कसे बनले बालेन शाह?

नेपाळमध्ये राजकारण्यांच्या मुलांच्या जीवनशैलीविरुद्ध सोशल मीडियावर #Nepokid हा ट्रेंड सुरू झाला. सरकारने इंटरनेट आणि सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जनरेशन-झेडने देशभरात शांततामय आंदोलने सुरू केली. यावर सरकारची कठोर प्रतिक्रिया दिसून आली. पोलिस कारवाईत देशभरात 20 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले. केवळ काठमांडूमध्येच 18 आंदोलकांचा जीव गेला आहे. या संपूर्ण आंदोलनाला बालेन यांनी आपला पाठिंबा दिला. त्यामुळे युवकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. काठमांडू महानगरपालिकेचे महापौर बालेंद्र शाह यांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध जनरेशन-झेडच्या नेतृत्वाखालील रॅलीला आपला पाठिंबा व्यक्त केला होता.

advertisement

नेपाळमध्ये आंदोलन का चिघळलं?

नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली. तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला तरुणांनी शांततेत आंदोलन केले. मात्र सरकारच्या कठोर कारवाईत 19 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले. एकट्या काठमांडूतच 18 जणांचा बळी गेला. अशा परिस्थितीत बालेन शाह यांनी तरुणांचा विश्वास संपादन करत आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेतले आणि तेच आता नव्या पिढीचे आदर्श ठरले आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Nepal Politics: आता बस्स, खुर्च्या खाली करा...Gen Z ने सरकार उलथवलं, तरुण पोरांचा नायक बालेन शाह कोण आहेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल