TRENDING:

सोमवारपासून लॉकडाऊन, नवे वेळापत्रक लागू; सरकारी ऑफिसात एक तास आधी काम सुरू, नवा 'वर्क पॅटर्न' लागू

Last Updated:

Nepal Lockdown News: नेपाळमध्ये आता शनिवारसोबत रविवारीही साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार सरकारी कार्यालयांचे वेळापत्रक सकाळी 9 ते सायंकाळी 5 असे राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
काठमांडू: नेपाळ सरकारने रविवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार आता सरकारी कार्यालयांसाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारी कार्यालयांचे कामकाजाचे वेळापत्रक सकाळी 9 ते सायंकाळी 5 असे निश्चित करण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

सरकारचे प्रवक्ते सस्मित पोखरेल यांनी सांगितले की सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना आता शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सुट्टी असेल. पेट्रोलियम पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळमध्ये आतापर्यंत केवळ शनिवारीच साप्ताहिक सुट्टी दिली जात होती. मात्र या आठवड्यापासून शनिवारीसोबत रविवारीही सुट्टी दिली जाणार आहे. यासोबतच सरकारी कार्यालयांचे कामकाज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

advertisement

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक संस्थांना वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांसाठी 9 ते 5 या वेळेचे वेळापत्रक कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वेळ मर्यादा शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर सर्व कार्यालयांवर लागू असेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

यापूर्वी नेपाळमधील सरकारी कार्यालयांचे कामकाज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत चालत होते. आता सकाळी एक तास आधी म्हणजे 9 वाजता काम सुरू होणार असल्याने वेळेत बदल करण्यात आला आहे. ही नवीन व्यवस्था सोमवारपासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी एक तास आधी म्हणजे 9 वाजता हजर राहावे लागणार असून यामुळे कामकाजाची कार्यक्षमता टिकून राहील, असा सरकारचा विश्वास आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
सोमवारपासून लॉकडाऊन, नवे वेळापत्रक लागू; सरकारी ऑफिसात एक तास आधी काम सुरू, नवा 'वर्क पॅटर्न' लागू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल