TRENDING:

सीमेवर युद्धाचा भडका! अफगाणिस्तानकडून एअरस्ट्राइकनंतर हल्ला, पाकिस्तानकडून Open War ची घोषणा

Last Updated:

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक केल्यानंतर तालिबानने जोरदार पलटवार केला. १५ पाक चौक्यांवर ताबा, ४० सैनिक ठार, भारताचीही पाकिस्तानवर टीका. परिस्थिती गंभीर.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.काबुलच्या धमाक्यांनंतर पाकिस्तानने रातोरात अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून एअर स्ट्राईक केला.पाकिस्तानी वायूसेनेने थेट अफगाण तालिबानच्या लष्करी तळांना टार्गेट केलं. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राइकचा बदला घेण्यासाठी तालिबान सरकारने आता आरपारची लढाई सुरू केली . गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या या संघर्षात अफगाण लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून १५ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.
News18
News18
advertisement

शुक्रवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि दक्षिणेकडील कंदहार शहरासह अनेक भागात हवाई हल्ले सुरू केल्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढला. तालिबान सरकारने दावा केला की अफगाण सैन्याने अलिकडच्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाण तालिबानाविरुद्ध ऑपन वॉरची घोषणा केली आहे. 

advertisement

तालिबानचा भीषण पलटवार

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ल्याचा बहाणा करत अफगाणिस्तानच्या हद्दीत एअरस्ट्राइक केली होती. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील १६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेने संतप्त झालेल्या तालिबानने योग्य वेळी हिशोब चुकता करू असा इशारा दिला होता. अखेर अफगाणिस्तानच्या २०१ खालिद बिन वालिद आणि २०५ अल बद्र ब्रिगेडने तोफा आणि रॉकेट लाँचरसह पाकिस्तानच्या लष्करी तळांवर रात्री हल्ला केला.

advertisement

पाकचे ४० सैनिक मारल्याचा दावा

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याने नंगरहार, कुनार आणि खैबर सीमाभागात पाकिस्तानच्या लष्करी तळांना टार्गेट केलं. या हल्ल्यात पाकिस्तानचे ४० सैनिक ठार झाले असून, त्यातील १३ मृतदेह अफगाण सैन्याने आपल्या ताब्यात घेतल्याचा दावा केला. नंगरहार आणि कुनार सीमाभागातील पाकिस्तानच्या ७ मोक्याच्या चौक्यांवर आता तालिबानी सैनिकांनी आपले सैनिक ठेवले आहेत.

advertisement

पाकला भारताचीही चपराक

एकीकडे सीमेवर तालिबानशी झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानला भारतानेही आंतरराष्ट्रीय पातळीवर खडे बोल सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या एअरस्ट्राइकची तीव्र शब्दांत निंदा केली. "रमजानच्या पवित्र महिन्यात महिला आणि मुलांचा बळी घेणे हे पाकिस्तानचे अमानवीय कृत्य आहे. आपली अंतर्गत अपयश लपवण्यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग करत आहे," अशा शब्दांत भारताने पाकला आरसा दाखवला आहे.

advertisement

परिस्थिती गंभीर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

सध्या सीमेवर दोन्ही बाजूने टँक, आर्टिलरी आणि मल्टिपल बॅरल रॉकेट लाँचरचा वापर केला जात आहे. पाकिस्तानच्या १५ चौक्या तालिबानच्या ताब्यात गेल्याने पाक लष्कराची मोठी पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांनी स्थलांतर केले असून, दोन्ही देशांमधील संबंध आता अशा वळणावर पोहोचले आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव असताना दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

मराठी बातम्या/विदेश/
सीमेवर युद्धाचा भडका! अफगाणिस्तानकडून एअरस्ट्राइकनंतर हल्ला, पाकिस्तानकडून Open War ची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल